‘पाऊस माझा २०२२’ विशेषाकांचे ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘पाऊस माझा २०२२’ विशेषकांचे ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांच्या हस्ते प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*….आणि पाऊस आला धावून..!*

नागपूर: मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या पाचव्या ‘पाऊस माझा २०२२’ विशेषंकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार, नाट्यलेखक श्याम पेठकर यांच्या हस्ते दि २०/०८/२०२२ रोजी आय टी पार्क येथील पीटीजी समूहाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या प्रकाश प्रसंगी पावसाच्या रिमझीम सरींनीही विशेषांकास शुभेच्छा दिल्या. प्रकाशनाच्या उपस्तिथीसाठी पाऊसही धावून आल्याने छोटेखानी कार्यक्रम बहारदार झाला.

या छोटेखानी प्रकाशन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण मुधोळकर, निवासी संपादक न्यूज नेशन मराठी वृत्तवाहिनी, डिजवीज प्रॉडक्शनचे संचालक अभिषेक आचार्य, क्षितीज इंगळे व शिक्षण विस्तार अधिकारी ललितकुमार बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पाऊस माझा विशेषांकाचे संपादक राहुल पाटील, कार्यकारी संपादक डॉ आशीष उजवणे यांच्या अथक प्रयत्नाने अवघ्या सहा दिवसात प्रकाशित करण्यात आलेला अंक पावसाच्या विविधांगी कविता व लेखांनी नटलेला हा प्रयोग असल्याचे संपादक यांनी प्रास्ताविकात सांगितले.

आयोजित बैठकीत व प्रकाशन समारंभास ‘आम्ही युवा’चे निशांत बरडे, नंदू लुचे, प्रभूदास रामटेके, चेतन कळवते, प्रशांत वाकडे, अशोक कांबळे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. श्याम पेठकर यांनी ‘जिवलग’ अंकाच्या पुढील प्रवासाची रूपरेषा मांडीत उपस्थित सदस्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles