सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान चौकात धरणे आंदोलन 27 उद्या

सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सविधान चौकात धरणे आंदोलन 27 उद्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आज देशात कोणीच काहीच बोलण्याची हिंमत करीत नाही, आणि जो बोलला तो रात्री निवांत झोपू शकत नाही. अश्या परिस्थितीत माणसांच्या समूहाला आवाज दिल्या नंतर ते आले तर आपण आवाज उठवू शकतो ही शक्यता बळावते आणि आपण विद्यमान शकती विरुद्ध उभे राहू शकतो ही शक्यता निर्माण होते. अशी एक शक्ती नागपूरच्या स्त्रियांमध्ये आहे. त्यांनी बिल्कीस बानो च्या प्रकरणात जी क्रूरता होती आणि ज्यांनी ते क्रौर्य केले त्यांचा सत्कार करणे ही संवेदन हीनता मानव्याला लाजविनारे आहे.

दुसरे..इंद्र मेघवालचा मृत्यू..दलित स्पर्श.. किती शतके अजून ही मानस माणसात येणार नाहीत. या देशातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, मुस्लिम, बंजारा आणि वंचित घटक केव्हा मोकळा श्वास घेतील…त्यांच्या साठी ही आम्ही उभे ठाकत आहोत. तिसरे राजमुद्रे चे विकृतीकरण..देशाचा सांस्कृतिक वारसा इतर देशात सांगताना बुद्धाची शांती आणि करुणा सांगायची म्हणून बुद्ध प्रतिमा देतो आणि सेंट्रल विस्टा जिथे जागतिक संगोष्टी होणार तेथे हिंस्त्र प्रतिकृती उभारतो हा ढोंगी आणि तकलादू व्यवहार नवीन पिढी पुढे कसे काय साकारतो..त्याचा निषेध.

सारनाथ मध्ये असलेली सिंहमुद्राच पुन्हा स्थापित करावी. कारण तो आमच्या देशाचा सांस्कृतिक वारसा आहे. ह्या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आणि खालील मागण्या सरकारनी मान्य कराव्या म्हणून दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी संविधान चौक दुपारी 12 वाजता सर्व संविधान प्रेमी लोक आणि सर्व सामाजिक संघटना यांनी धरणे करण्याचे ठरविले आहे.

_प्रमुख मागण्या:_

1.राजमुद्राजी नवीन बसविली आहे ती बदलवून आधी होती शांत आणि संयमी राज मुद्रा पुनर्स्थापित करावी.
2.बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्या आरोपींना पुन्हा जेल मध्ये टाकावे.
3. इंद्र मेघवाल यांच्या हत्याऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप द्यावी.
4. जातीयता नष्ट करण्यासाठी अभ्यासक्रमात त्या संदर्भातील अभ्यासक्रम शिकवला जावा.
5. प्रत्येक जिल्ह्यात फास्ट ट्रॅक न्यायालये उभी राहावी जेणे करून दलितांना आणि महिलांना त्वरित न्याय मिळू शकेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles