ईसासनीच्या उपसरपंच मीना मेश्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पदमुक्त करा

ईसासनीच्या उपसरपंच मीना मेश्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पदमुक्त करा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_संतोष कटरे माजी सरपंच यांची मागणी_
हिंगणा :- गट ग्रा.प.ईसासनी ( वागधरा) प.स.हिंगणा जी.प.नागपूर च्या उपसरपंच मीना मेश्राम यांनी दि.०५/१२/२०१९ रोजी सदर ठिकाणचे शासकीय खर्चातून वृक्षारोपण केलेली झाडे तोडून अतिक्रमण केले व त्या ठिकाणी स्वतः करीता खड्डे करून सिमेंट कॉंक्रेट करून काम केले व या बाबत नागरिकांनी संबंधित विभागाला तक्रार केल्याची चाहूल होताच अतिक्रमण केलेले बांधकाम थांबविण्यात आले.

पण याबाबत संबंधित शासकीय विभागाने कोणतीही कारवाई न करता केलेले अतिक्रमण जशेच्या तसे ठेवले व आता तीन वर्षांनी आपले शासकीय विभागाने काहीच बिगडवले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात जोमात बांधकाम उपसरपंचा यांचे कडून सुरू केले. या बाबतचे व्हीडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताच व ही बाब कर्त्यव्यदक्ष असलेले साझा क्र.४६ चे तलाठी अरुणकुमार गडपायले यांच्या निदर्शनास येताच दि.२५/०८/२२ रोजी उपसरपंचा मीना मेश्राम यांना नोटीस बजावली की आपण अतिक्रमण करून विना परवानगी सुरू केलेले बांधकाम तात्काळ बंद करून जागा खाली करण्या बाबतचा नोटीस देण्यात आला असून दिलेल्या नोटीसच्या आधारे कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पदमुक्त करावे व सदर बाब आपल्या विभागाला निदर्शनात न आणून दिल्या बाबत सरपंच निलेश उईके यांना सुद्धा पदमुक्त करण्यात यावे या आशयाची तक्रार मा.जिल्हाधिकारी नागपूर , मा.इंदिरा चौधरी उपविभागीय अधिकारी नागपूर ,( ग्रामीण ) यांचेकडे माजी सरपंच संतोष कटरे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles