शिवशक्ती नगरात तान्ह्या पोळ्याचे अनोख्या पद्धतीने आयोजन

शिवशक्ती नगरात तान्ह्या पोळ्याचे अनोख्या पद्धतीने आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर, प्रतिनिधी (देवराव प्रधान)

नागपूर: दक्षिण नागपूर येथील शिवशक्ती नगर नंबर 2 येथे प्रथमच नारिशक्ती महिला संघटनेच्या वतीने तान्ह्या पोळ्याचे अनोख्या पद्धतीनें आयोजन शनिवारी सायंकाळी ५ वाजता. करण्यात आले होते. याप्रसंगी सौ. वैशालीताई सुधाकर कोहळे आणि समता दीपस्तंभ ग्रुपच्या सौ. कल्पनाताई गोटेवार यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते व विशेष अतिथी पाहुणे विजय मुनेश्वर, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच संघचालक मनोहर सपकाळ, भाजपचे वार्ड अध्यक्ष बाबाराव तायडे यांच्या उपस्थितीत श्री गणेशाची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी मनोहर सपकाळ संघ कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि देवराव प्रधान यांची उपस्थिती होती. छोट्यां मुलांना आर्थिक मदत व बक्षिस वितरण तसेच वेशभूषा व उत्कृष्ट नंदी बैल सजावट यांच्यावर बक्षिसे देण्यात आले.

वैशाली सुधाकर कोहळेंच्या वतीने सर्व लहान मुलांनाच प्रोत्साहन बक्षीसे देण्यात आले. जवळजवळ शंभर मुले नंदीबैला सोबत पोळ्यामध्ये आले होते. मनोहर सपकाळ यांनी यावेळी तान्ह्या पोळ्या बद्दल आपले विचार व्यक्त करत सांगीतले की आपली संस्कृती जपण्यासाठी आपण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तान्हा पोळा सण साजरा करतात असे व्यक्त केले. शिवशक्ती नगरात तान्ह्या पोळ्यात अनोख्या पध्दतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपाल वेशभुषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच झाँसी की राणी, कृष्ण अवतार, महाकाली माता, शारदा माता, लक्ष्मी माता, भगवान शिवशंकर, श्रीकृष्ण रुपात आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वतः मोदी बाल वेशभुषेत साक्षात अवतरले.

सामाजिक संदेश घेऊन येणारी बालिका बेटी बचाव, बेटी पढाव, जल है तो कल है, झाडे लावा झाडे जगवा, जय जवान जय किसान जय विज्ञान, अशा प्रकारे छोट्या मुलांनी जर ठरवलं की इतरांच लक्ष आपल्याकडे वेधायचं आणि त्यातून सामाजिक बांधिलकी आणि देशाची बांधिलकी कशी जोपासायची याच एक उदाहरण येथे पाहायला मिळालं. या कानोल्या चिमुकल्यांनी स्वतःची वेशभूषा अशी बनवली की, प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं की, आपल्या देशांमध्ये किती महान लोक होऊन गेले. मग गाडगे बाबा असो की, नरेंद्र मोदी असो या सगळ्यांची वेशभूषा रंगवून पोळ्याला एका सामाजिक बांधिलकीच स्वरूप आणलं.

पुढे येणारी पिढी ही राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आणि देशाला पुढे नेण्यासाठी असलेल्या सर्व बाबींमध्ये पूर्णपणे अग्रेसर राहील. आणि त्यांची जाणीव छोट्या मुलांना आहे. याच आज सुंदर उदाहरण येथे पाहायला मिळालं. दक्षिण नागपूरचे लाडके आमदार मोहन मते यांच्या द्वारा ‘प्रथम बक्षीस’ सायकल तिथिक्षा चट्टे व रियांश बुराडेने शिवाजी महाराजांचे वेशभुषेकरिता सायकल देण्यात आली. ‘दुसरे बक्षीस’ शिवशक्तीनगर सर्व नागरिकांतर्फे ट्रॉली बॅग उत्कृष्ट बैल सजावट भारगवी ढगे हिला देण्यात आली. आणि ‘तिसरे बक्षिस’ भाजपचे वार्ड अध्यक्ष बाबाराव तायडे यांच्याद्वारे वेशभूषेकरिता स्टडी टेबल दिप्ती घडोले ला देण्यात आले. प्रदीप बेसरवार यांच्याकडून रोख पारितोष व स्कूल बॅग आरव नानोटे व पार्थ भोसले यांना देण्यात आले.

प्रास्ताविक मध्ये तान्हा पोळाचा संपूर्ण इतिहास सांगून विकास गायधने यांनी संचालन केले.शिवशक्ती नगरच्या मंदिर परिसरातील व आजूबाजूच्या नागरिकांचे खूप सहकार्य लाभले. नारीशक्ती महिलांमध्ये साक्षी हिंगे, सुवर्णा नंदुरकर, मंजुषा गायधने, संचिता बेसरवार, मंजुषा कांदे यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने सर्व महिलांनी आणि इतर नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles