कॅडबरीच्या दुनियेत…हरवला बोजारा…!

कॅडबरीच्या दुनियेत…हरवला बोजारा…!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय…
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय…..?
भोलानाथ…भोलानाथ..

बालसुलभ वयात प्रत्येकाच्या आवडीचे हे गीत कधी ना कधी कानावरून गेलेच असावे आणि कधी गुणगुणले पण असावे… नाही का..? या गीतातील भोलानाथ अर्थात नंदीबैल.या बालगीतातून त्याच्याशी जमलेली बाळगोपाळांची गट्टी… तान्ह्या पोळ्यातील लाकडी बैलासोबतही तितकीच समरसून जमते.
बैलपोळा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी ‘तान्हा पोळा’ असतो. लाकडी बैल सजवून घेऊन छोटी छोटी मुले मुली मारूतीच्या मंदिरात किंवा मोकळ्या मैदानात भरलेल्या तान्ह्या पोळ्यात जातात. तेथे उपस्थित मंडळीच्या हस्ते बाळगोपाळांचे कौतुक करून , खाऊ, बक्षीस देऊन पोळा फुटतो. त्यानंतर घरी आल्यावर आई बैलाचे, बाळांचे औक्षण करून हातावर प्रसाद आणि काही पैसे हातावर ठेवते हाच तो बोजारा.
लहानपणी किती कौतुक असायचे ना या बोजाऱ्याचे…पॉकेटमनी नसलेल्या काळात, कुणी पाहुणे घरी आल्यास खाऊ घेण्यासाठी दिलेल्या पन्नास पैसे, एक रुपयांत जो आनंद असायचा तोच आनंद या बोजाऱ्यात असायचा. रिकाम्या पॉण्डस् पावडरच्या डब्याच्या झाकणावर उभे चिरून त्यात गोळा केलेली नाणी, कधी एखाद दुसरी नोट छणछण वाजवून बघताना एक अनामिक ओढ असायची. बचतीची ती एक रूजवात असायची.
आज चंगळवादाच्या दुनियेत हे सारं निरागसपण हरवलं जात आहे. आम्हाला नाही मिळालं ते आम्ही मुलांना देतोयं, आम्ही वेळ नाही देऊ शकत मुलांना त्याऐवजी महागडी खेळणी खाऊ देतोयं…अशा या मनोवृत्तीतून किंवा कधी नाईलाज म्हणून अल्लादिन च्या जादूई दिव्याप्रमाणे सारं काही झटपट मिळण्याच्या नादात…संयम धीर या गोष्टी सुटत चालल्या…हे कुठेतरी थांबायला हवं…बालपण बालपणासारखंच मुलामुलींनी अनुभवायला हवं…खरंय ना…दातांनी तोडून खाल्लेल्या संत्रागोळीतील मजा कॅडबरीच्या दुनियेत हरवायला लागली असं नाही का वाटत…? आणि म्हणूनच वाटतेयं..कॅडबरीच्या दुनियेत हा बोजाराही तर हरवत नाही ना जाणार…?

✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles