हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बसपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची समीक्षा बैठक संपन्न

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बसपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची समीक्षा बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा झोनचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ होऊन मेट्रो ट्रेन ने होणार “कार्यकर्ता मेळाव्यात” सहभागी रविवार दि. 28/8/22 ला सायंकाळी काळमेघ नगर हिंगणा रोड नागपूर येथे हिंगणा विधानसभेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची समिक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीचे अध्यक्ष नागोराव जयकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश, इंचार्ज नागपूर झोन, प्रमुख उपस्थिती विजयकुमार डाहाट सचिव महाराष्ट्र प्रदेश, इंचार्ज नागपूर झोन, रंजना ढोरे सचिव महाराष्ट्र प्रदेश अमित सिंग उपाध्यक्ष नागपूर जिल्हा यांनी विधानसभेतील बसपाच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनासह आढावा घेतला दि.०१ /०९ /२०२२-ला नागपूर बर्डी येथील हिंदी मोर भवन मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळावा सफल करण्यासाठी सेक्टर, बुथचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहाण्यासाठी योग्य नियोजन करुन कार्यक्रम सफल करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे सुचविण्यात आले.

प्रसंगी महेश वासनिक अध्यक्ष हिंगणा विधानसभा यांच्या नेतृत्वात हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर करण्यासह बहुसंख्येने सेक्टर व बुथ च्या पदाधिकाऱ्यांसह विशेषतः जास्तीत जास्त महिलांना या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी करवून घेण्यासाठी तत्परतेने कार्य करुन नियोजित कार्यक्रम सफल करण्याचा विश्वास व्यक्त केला, संघटन मजबुती साठी विधानसभा कोषाध्यक्ष तथा आढावा सभेचे स्वागताध्यक्ष आदेश लोखंडे यांनी विधानसभेच्या कोषागारातून ठरल्याप्रमाणे नागपूर जिल्हा संघटनेला मासिक सहयोग निधी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांच्या कडे हस्तांतरीत केली.

हिंगणा झोन परीसरातील पदाधिकाऱ्यांसह महिला, पूरुष कार्यकर्ते विधानसभा अध्यक्ष यांच्या सोबत लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन सि.आर.पी.गेट वरुन एकसंघ होऊन कार्यक्रमात उपस्थित होणार आहेत असे जाहीर करण्यात आले. प्रसंगी सभेला हिंगणा झोन कार्डीनेटर सुरेश मानवटकर बुट्टिबोरी झोन कार्डीनेटर सतिश शेळके वाडी झोन कार्डीनेटर सुधाकर सोनपिपळे कान्होलीबारा झोन कार्डीनेटर रवींद्र शंभरकर नागपूर जिल्हा माजी प्रभारी राजकुमार बोरकर विधानसभा सचिव गोपाल मेश्राम उत्तर भारतीय भाईचारा कमेटी संयोजक प्रेमलाल कुँवर आदिवासी भाईचारा कमेटी कैलास मसराम ओबीसी भाईचारा कमेटी संयोजक गजानन बिरेली महिला संयोजिका शितल मंडपे वाडी शहर महासचिव सुभाष सुखदेवे वानाडोंगरी शहर महासचिव प्रशांत दिवे जेष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र शेंडे, विनोद मून, सुनील थुल बुट्टिबोरी सेक्टर अध्यक्ष विजय चिकाटे, अरविंद मेंढे हिंगणा,वानाडोंगरी सेक्टर अध्यक्ष लोकेश काटोले, शानू शेख डीगडोह सेक्टर अध्यक्ष पूंडलीक धवने उपस्थित होते.

आढावा सभेचे संचालन व प्रास्ताविक हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक तथा आभार उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोसे यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles