गणेशोत्सवानिमित्त सॅलेड डीश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त सॅलेड डीश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: राज्यात सर्वत्र मागील दोन वर्ष कोरोना या विषाणूने हैदोस घातला होता. आता जून २०२२ पासून शाळा नियमित चालू आहेत. या दोन वर्षात सर्वच उपक्रम घेता आले नाहीत.आता मात्र या वर्षी सर्वच शाळांमधे उपक्रमांची रेलचेल चालू आहे.जवळ जवळ या तीन महिन्यात दहा तरी उपक्रम झाले आहेत.

शासनाचेही उपक्रम राबवले जात आहेत. तर या वर्षी दरवर्षीप्रमाणेच शालेय गणेशोत्सव दि.३१/०८/२०२२ ला सुरू झाला. या निमित्ताने अरण्येश्वर विद्या मंदीर,सहकारनगर येथील शाळेत आज दि.१/०९/२०२२ रोजी शालेय गणेशोत्सवानिमित्त सॅलेड डीश डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आली.

मुलांनी सॅलेडचे साहित्य काकडी, गाजर, बीट,कांदा, कोबी इ.पदार्थ घरून आणले. सुरी, साल काढणी, डीश या वस्तू आणल्या.व सर्व मुलांनी मिळेन पदार्थ छान डीशमधे सजवले. जयमाला राऊत, शुभांगी बोगम व कल्पना यादव बाई यांनी डीशचे निरीक्षण, परीक्षण करून पहिले तीन क्रमांक काढले.

कु.केतकी चांदणे, प्रिया पाटोळे, निवेदिता भोसले या तीन मुलींचे व सहभागींचेही परीक्षकांनी कौतुक केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मुलांचे कौतुक केले. मुलांनीही या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद दिला.
याप्रसंगी मा.मुख्याध्यापक सौ.अनिता गायकवाड , शिक्षक सौ.जया भांडवलकर, सौ.मनिषा ढवळे, सौ.ज्योती पुरकर ,सौ.स्वाती सगर,सौ. रेखा भोर,सौ.राजश्री कडलग , सौ.मोहोळ, सौ.थिटे या सर्वांनी मुलांचे कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles