काबुलमध्ये बॉम्बस्फोट; रशियन दुतावासाच्या दोन अधिका-यासह २० जणांचा मृत्यू

काबुलमध्ये बॉम्बस्फोट; रशियन दुतावासाच्या दोन अधिका-यासह २० जणांचा मृत्यू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काबुल : अफगाणिस्थानची राजधानी काबुलमध्ये खळबळ माजवणारी घटना घडली आहे. आज सोमवारी रशियन दुतावासाच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला, त्यावेळी नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. या दुर्देवी घटनेत दुतावास मध्ये असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रशियन सरकारी संस्था आरआईए नवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी खूप नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. एक रशियन अधिकारी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आला, त्याचवेळी मोठा स्फोट झाला. हा बॉम्बस्फोट करणारा दहशतवादी होता. हल्ला केल्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला जागीच ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या हल्ल्याबाबत कोणत्याही संघटनेनं पुष्टी केली नाहीय. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगानिस्थानमध्ये झालेला हा पहिला हल्ला होता. मागील वर्षी अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांनी अफगानिस्थान सोडण्याच्या आधी इस्लामिक स्टेट ग्रुपशी जोडलेल्या हल्लेखोरांनी तालिबानवर हल्ले करणं बंद केलं होतं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles