वनक्षेत्र सहाय्यकाचा मृत्यू की आत्महत्या? एन्टी करप्शन ब्युरोचा धसका घेतल्याची चर्चा

वनक्षेत्र सहाय्यकाचा मृत्यू की आत्महत्या? एन्टी करप्शन ब्युरोचा धसका घेतल्याची चर्चापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

नागपूर/ विदर्भ: नागपूर जिल्ह्यात महिनाभरापूर्वी पदोन्नतीवर रुजू होऊन, हिंगणा येथे वनरक्षक असलेल्या लोहारे हे जुलै महिन्यापासून लेंडेझरी येथे सेवारत होते. परंतु, भंडारा वन विभागांतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वन सहाय्यकाचा झाडाला लटकलेल्या स्थितीत अजाबराव लोहारे यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारला सकाळी उघडकीस आली. अगोदर विषप्राशन केले त्यानंतर मोठ्या स्कार्फने चेहरा झाकून झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह लटकविण्यात आला. त्यामुळे ही ‘हत्या की आत्महत्या’ असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, हत्या की आत्महत्या याबाबत शंका उपस्थित होत आहे.

अजाबराव सिताराम लोहारे वय वर्ष (५२) मूळ गाव उमरेड जि. नागपूर हल्ली मुक्काम विटपूर (वन क्षेत्र मुख्यालय) असे मृतक क्षेत्र सहाय्यकाचे नाव आहे. मागील तीन दिवसांपासून अजाबराव हे कर्तव्यावर नसल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारला सकाळी त्यांचा मृतदेह कांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गायमुख लोहारा मार्गावरील लोहारा क्षेत्रातील पांगडी बीटमधील कक्ष क्रमांक ५४ मधील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच कांद्रीचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे लेंडेझरीच्या वनपरिक्षेत्राधिकारी भडांगे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेची माहिती मिळताच आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी मृतकाचा मुलगा मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे.

*एसीबीने बजावला होता समन्स*

लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विटपूर येथे अजाबराव लोहारे हे क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अधिनस्त असलेले वनरक्षक गणेश काकरवाल, मनीष मेश्राम यांच्यासह चौघांना लाच रकमेसह अटक केली होती. याच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अजाबराव लोहारे यांना शनिवारी एक समन्स बजावून सोमवारी भंडारा कार्यालयात बयानासाठी बोलावले होते. समन्सची धडकी घेतल्याने लोहारे हे रविवारपासून कर्तव्यावर गैरहजर होते. दरम्यान, ते सोमवारी एसीबीच्या भंडारा कार्यालयातही पोहोचले नव्हते.

*कर्तव्य क्षेत्राच्या बाहेर घटना*

अजाबराव लोहारे हे लेंडेझरी वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना त्याचा मृतदेह कांद्री वन परिक्षेत्रातील पांगडी बिटमध्ये आढळून आला. त्यांना आत्महत्याच करायची असती तर, त्यांच्या कार्यक्षेत्रातील जंगलातही करू शकले असते. मात्र, कार्य क्षेत्राबाहेर त्यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला असल्याने पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles