शिक्षणाधिकारी (प्राथ.)गोंदिया यांना साहित्यगंध दीपोत्सव अंक सस्नेह भेट
किशोर बन्सोड, प्रतिनिधी
गोंदिया: दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ला आ .एम .आर .गजभिये शिक्षणाधिकारी( प्राथ) जि.प.गोंदिया यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा प्रकाशित साहित्यगंध दीपोत्सव चे अंक किशोरकुमार बन्सोड स.शि.रतनारा प .स .गोंदिया यांनी सस्नेह भेट दिले.
यावेळी संस्थेद्वारे मराठी भाषा सक्षमीकरणासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी साठी अनेक समूहाच्या माध्यमातून राबवीत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सुद्धा शिक्षणाधिकारी साहेबाना देण्यात आली .यावेळी सोबत श्री .आर .डी .चौधरी मुख्याध्यापक रतनारा हे सुद्धा उपस्थित होते .