
कास्ट्राईबच्या तमाम शिलेदारांचे जाहीर आभार; राज्य सरचिटणीस सतीश कांबळे
परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारणी सभा दि २८ मे रोजी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मा. कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
या बैठकीत राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. राज्य कार्यकारणीत विविध पदावर नियुक्त झालेल्या सर्व पदाधिका-यांचे मनस्वी अभिनंदन. या बैठकीस जमेल त्या, एसटी, ट्रेन, चार चाकी, विमान वाहनांनी येऊन उपस्थित झालेल्या कास्ट्राईबच्या तमाम शिलेदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो. आपले सहकार्य असेच लाभावे अशी आशा व्यक्त करतो.