बाईपण भारी देवा..

बाईपण भारी देवा.!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ओलांडून उंबरठा वाट नवी शोधते
भेदून तू संकटांना घाट नवा कोरते
बाई पण भारी देवा… बाई पण भारी रं….!

असं ‘बाईचं भारी पण’ दाखवणारा चित्रपट पाहिला अन् मन कसं हलकं फुलकं झालं. चित्रपट जरी स्त्री प्रधान असला तरी पुरुषांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असाच हा चित्रपट. अनंत नात्यात गुरफटलेली स्त्री प्रत्येक नातं तितक्याचं सहजतेने निभावते. नात्यांचे बंध जपताना तेच तिच्या जगण्याची बंधन होतात. हे या चित्रपटात पहायला मिळते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्री ला कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि त्यातून हिरावलं जाणार तिचं जगणं…हे आणि असं बरंच काही…खुसखुशीत, चमचमीत तसं झणझणीत बाईपण या चित्रपटातून दाखविणाऱ्या लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक केदार शिंदे’ यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.

First day First show पहायचं ठरवलं. पण….. बाईपण भारीच ना देवा…. कधी पाहुणे… तर कधी कार्यक्रम….तर कधी….! अहों ना भरपूर आग्रह केला, पण स्वारी काही तयार होईना. शेवटी कसेबसे मैत्रिणीला बरोबर घेऊन सिनेमा पहायला गेले.चित्रपटाचा विषय होता मंगळागौर.असं वाटलं?काय बरं असेल.!ही मंगळागौर..! आणि बघता बघता उलगडा झाला. Start to End पर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट सहा अभिनेत्रींच्या अभिनयाने खुलून गेला. गोल गोडुली, सोज्वळ, सात्विक सुकन्या. डॅशिंग चटपटीत सौन्दर्यवती वंदना. गालावर खळी डोळ्यात धुंदी असणारी सुचित्रा. जिथे तिथे तारेवरची कसरत करायला लागणारी लेडीज अमिताभ दीपा. अभिनयाचा मुरंबा रोहिणी ताई. श्रीमंतीचा टेंभा मिरवणारी पण तितकीच इगोस्टिक जिद्दी शिल्पा. अशा सहा अभिनेत्री सहा सख्या बहिणींच्या नात्यात….. सगळ्यांच्यातच अभिनय ओत प्रोत भरलेला. त्यामुळे चित्रपटाला खऱ्या अर्थाने रंग चढला.

चित्रपटात सगळ्याचं 40 ते 50 शीतल्या. त्यांचं आयुष्य, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांची खिन्नता बघतांना वाटतं की, मी पण यातलीच एक आहे का..? रोहिणी हट्टंगडी – यांनी अभिनयाच्या ताकदीवर उभी केलेली एक dipressd बाई जया वंदना गुप्ते – ऑल टाइम यंग लेडी जितकी अहंकारी बाई तितकीच कर्तव्यता निभावणारी आई शशी, सुकन्या – टिपिकल वर्किंग वुमन, माझ्या शिवाय संसाराला अर्थच नाही असं वाटणारी, स्वतःच अस्तित्व हरवलेली बाई..साधना… जेव्हा गाण्याची प्रॅक्टिस करते ते पाहताना असे वाटते की, देवा, आमचंही असंच झालय का काहीसं.? शिल्पा -“only shinner lady”,नटणं, मुरडणं आणि श्रीमंतीचा तोरा मिरवणारी नवऱ्याच्या जिवावर मजा मारताना नवऱ्याकडून जेव्हा अलगद दुखावली जाते तेव्हा खाडकन डोळे उघडतात अशी एक जिद्दी बाई.. केतकी.

सुचित्रा बांदेकर -खचाखच सौंदर्य तरीही नवऱ्याच्या आयुष्यात आलेली गर्लफ्रेंड बघतानाही ती दुखावते तरी त्याला घटस्फोट न देणारी बाई पल्लवी, दीपा – घर, संसार,कुटुंब, नवरा आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करते तरीही नवऱ्याचा ओरडा सहन करत स्वतःला अपराधी मानणारी बाई चारू. अशा या दुरावलेल्या सहा बहिणी जेव्हा मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येतात तेव्हा त्या प्रत्येकीच्या आयुष्यातील प्रसंग. रोज नवे रंग फासून हसतेस दुःखावर स्वप्न रोज तासून तू ठेवतेस गाडाभर जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर ठिणगीला भिडणार आगर
बाईपण भारी देवा, बाई पण भारी रं….! हे पटायला लागतं. प्रत्येक बाईला आवडतील असे चित्रपटातील प्रसंग…!

म्हणूनच प्रत्येक स्त्रीने ततर आवर्जून पहावा. अरे,अलीकडे आपण 40 नंतर हसणं विसरून गेलोय..पण चित्रपटाच्या पूर्वार्धातील काही प्रसंग प्रत्येक स्त्रीला खळखळून हसायला लावतील असे हलकेफुलके…रेल्वे स्टेशनवर बाहेर घातलेला पिंग्याचा धुडगूस असो की, शॉपिंग करताना सहजगत्या घडणारे ते मिश्किल विनोदी डायलॉग. हसता हसता खुर्चीतून खाली पडतोय की काय असं क्षणभर वाटून जातं…! आणि शेवटी start ची ती मंगळागौर… ते अप्रतिम बहारदार नृत्य. म्हणूनच हे सगळं पाहताना. ‘बाई पण भारी देवा,!’ जितकं भारी वाटलं ना….! तितकच मन हलकं झालं….! दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनय सम्राज्ञी सहा जणी (साजणी )यांना “Hatts of”.. आणि माझ्या सर्व सख्यांना आग्रहाची विनंती की, प्रत्येकीने घराबाहेर पडा आणि पहा…!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles