सांजवेळ
येई रे सख्या परतुनी
दिनु ढळला उन्हाचा
जाहल्या तिन्ही सांजा
सूर यमुनातटी कान्हाचा
परतली पाखरे घरट्यात
धेनु गोठ्याकडे हारेने
कामकरी, शेतकरी
निघाली माघारा त्वरेने
सावल्या लांबून निवल्या
एकरुप मातीशी
गर्द पांदीही अंधारल्या
दिवे बोलले वातीशी..
तुझ्या पावलांची उगा
चाहुल भासे दाराशी
उंबऱ्यात येऊ पाहता
कातर हुरहूर उराशी..
येई वेगे साजना
आवेग वाढवी सांजवेळ
ढळून जाता सावल्या
मज जाळीते कातरवेळ
संगीता पांढरे
इंदापूर, पुणे
=======