ती लाजते तेव्हा..

ती लाजते तेव्हापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दुःख दैन्य माझे मावळे
हे पाहताच सुख सोहळे
वाटे देहाचे व्हावेत डोळे
ती लाजते तेव्हा….//

असे लाजेत तिचे भिजणे
होई जागीच माझे थिजणे
वाटे हेच असावे भाळणे
ती लाजते तेव्हा… //

क्षितिजी नभाचे झुकणे
धरणीस हळूच चुंबने
वाटे गळावी अशीच बंधने
ती लाजते तेव्हा… //

प्रित गंधात गुणगुणने
कमलपुष्पात कैद होणे
वाटे भ्रमराचे गावे गाणे
ती लाजते तेव्हा… //

सरिता दुरून दौडत येई
सागर तिजला कवेत घेई
वाटे घडावे अशी नवलाई
ती लाजते तेव्हा… //

कौतुक करावे केवढे
ह्रदय होई सुपा एवढे
वाटे यासाठीच व्हावे वेडे
ती लाजते तेव्हा… //

लाज ऐवज असे न्यारा
फिका सुवर्णलंकार सारा
वाटे हाच मलाही प्यारा
ती लाजते तेव्हा… //

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles