माझ्याचं घरात मी पाहुणी….!!

माझ्याचं घरात मी पाहुणी….!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कधी कधी असं वाटतं, की नक्की नेमकं कोणतं घर माझं …
लग्न झाले की माहेरच्यांसाठी मी पाहुणे होते… काही घ्यायचं म्हटलं तर विचार करावा लागतो किंवा विचारावं लागते अशीच एक नवी नवरी होती अगदी एक दोन महिने लग्नाला झालेली तिचा दात खूप दुखायला लागला दाताच्या दवाखाना करायचा म्हटलं की खूप खर्च असतो तिला वाटलं माहेरी म्हणावं तर आई वडील म्हणतील आता सासरच्यांना नाहीतर आता मिस्टरांना सांग. सासरी म्हणावं तर म्हणतील आत्ताच घरात आली नाही तोपर्यंत झाला दवाखाना चालू बिचारी संभ्रमात पडते निमुटपणे फक्त सहनच करते. घरगुती उपाय करते मेडिकल मधल्या गोळ्या खाती आणि तात्पुरते दुखणे पुढे ढकलती सुरू झाला आता तिच्या आयुष्यातला सारीपाट. थोडीशी मनात जाणीव होती कोणीच नाही का आपुलकीने विचारणार सर्वांना पैसेच प्यारे आहेत का नंतर थोडीशी संसारात रमती.

काही काळानंतर दिवस जातात घरातील सर्वांना खूप आनंद होत असतो तेव्हा मात्र सर्वजण बाळामुळे कोड कौतुक करतात रूढी परंपरेने पहिलं बाळांतपण बारसं हा खर्च आई-वडिलांचा असतो. बाळ सासरी आल्यावर सासरचा बऱ्याच दिवसानंतर बाळ थोडं थोडं मोठं व्हायला लागलं दुडू दुडू धावायला लागलं पुन्हा एकदा दात दुखी चालू होती मिस्टर दवाखान्यात नेतात आणि कॅप बसून आणतात तोच मोठा उपकार होतो नंतर कारण मी काही कमवत नसते ती एक गृहिणी असते पहिली मुलगा चार वर्षेचा झाल्यानंतर दुसरी मुलगी होते खुप आनंद होतो नंतर हळूहळू सत्ता हातात येते पण तरीही मी कधी पैशाचा व्यवहार हातात नसल्यामुळे स्वतःसाठी काही खर्च करावासा वाटत नाही कारण आता घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात अधून मधून हिशोब मागणारे असतात पुन्हा एकदा दात दुखायला चालू होतो नंतर तर डॉक्टर दात काढायला सांगतात. दात काढला जातो.

मुलं मोठी होतात त्यांचं लग्न होतं सून घरात येते आता मात्र काही दिवसातच सून चहा पिणार का विचारते.. मिस्टर सुद्धा सढळ हाताने पैसे देत नाहीत म्हणतात अग मुलाला माग मात्र परत वाटतं खरंच की माझ्याच घरात मी पाहुणी… दात बसवायचा तर कोणी नावच घेत नाही तोपर्यंत दुसरी अनेक आजाराची बिल वाढायला लागलेली असतात कसं म्हणावं माझ्यासाठी खर्च करा थोडं काही बोलूही शकत नाही त्या सर्वांना ति किट किट वाटत असते पुन्हा एकदा मी हातबल होते नंतर सुनबाईला दोन जुळी मुलं होतात मग मात्र ती मुले वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर पडते कारण सुनबाई सर्विस वाली असते ती मुले हळूहळू मोठी होतात नंतर काही दिवसानंतर त्यातील एक मुलगा येतो आणि विचारतो आजी तुला करमत नाही का अगं माझ्या मित्राची आजी बाबा वृद्धाश्रमात ठेवली आहेत समवयस्कर खूप लोक तिथं असतात मग तुला पण जायचं का मीही म्हणते आता माझी गरज संपली आमच्या दोघांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते नंतर काही काळ गेल्यानंतर मुलाला सुनेला वाटते की आपण आई-बाबांना उगीच वृद्धाश्रमात पाठवलं मग दोन्ही नातवंडे मुलगा आणि सून वृद्धाश्रमात येते आणि आम्हा दोघांना परत आमच्या घरी स्वागत करून फुले टाकून पंचारतीने ओवाळून समाजाला स्टेटसला दाखवण्यासाठी पुन्हा आमच्याच घरी आम्हाला वाजत गाजत नेले जाते पुन्हाही मी गालात हसते आणि म्हणते माझ्याच घरी मी पाहुणी…. असा प्रसंग प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात येत असतो.

माझ्या एका मैत्रीणीची सुन लग्नाला दहा वर्षे होऊनही तिला मूल होऊ शकत नाही म्हणून सासूबाई मुलाचं दुसरं लग्न करतात घरात सवत आणतात आणि ती मालकीणीची मोलकरीण होते तिच्याच घरात ती पाहुणी होते… आपण पुरुषांना दोष देतो पण थोड्याफार प्रमाणात त्यांच्या भूमिका गौणच असतात बाईचं बाईची खरी शत्रू असते आई, बहीण, सासू,जाऊ, ननंद, भाऊजई या माणुसकी पेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात पैसाच सर्वस समजतात आणि नाजूक विणलेली नाती चुरगळून पायाखाली तुडवतात.

सुजाता गडसिंग इंदापूर पुणे

=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles