Artificial intelligence म्हणजे काय ?

Artificial intelligence म्हणजे काय ?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता हा आजच्या युगातला सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टीत प्रगती झाल्याचे दिसून येते.
भविष्यामध्ये येणारे २१वी शतक हे पूर्ण पणे कृत्रिम बुद्धिमत्ताचे असेल. त्याचा वापर करुन प्रत्येक क्षेत्र विकसित होणार आहे. जे आता कृत्रिम बुद्धिमत्ताच काही उदा. म्हणजेच गूगल मैप्स, गुगल लेन्स, अलेक्सा किंवा सिरी यांचा उपयोग दैनंदिन जीवनात सर्वात जास्त होत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही काहीं शास्त्रज्ञांसाठी नवीन संकल्पना नाही. जुन्या ग्रीक किंवा इजिप्शियन संस्कृतीमध्ये यांत्रिक पुरुष यांच्याबद्दल उल्लेख आढळतो, याच तंत्रज्ञानाचा वापर करुन 1972 ला जपानमध्ये पहिला रोबोट बनवण्यात आला , त्याचे नाव ‘वॉबोट-1’ असे होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन अनेक मोठया कंपन्या म्हणजे गुगल, फेसबुक, आयबीम आणि अमेझॉन नवीन उपकरणे तयार करत आहेत. त्याचा वापर करून इंटेलिजेंट मशीन बनवल्या जातात. ज्या मानवा सारखे सर्व काम करतात. त्याला मनुष्यासारखी विचार करणे व निर्णय घेण्याची क्षमता पण असते. त्या मशीनला कमांड देण्याची गरज नाही, ती स्वतःच सर्व निर्णय घेऊ शकते.

कृ‌‌‌त्रिम बुध्दिमत्ता मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग नक्कीच बनणार आहे. शिक्षणासाठी कॉलेज या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करत आहे. संपूर्ण जगात कृ‌‌‌त्रिम बुध्दिमत्ताचे विविध रिसर्च सेंटर उपलब्ध झाले आहेत .तंत्रज्ञानाचा वापर करून काही दिवसापूर्वी चालक नसलेली कार बनवण्यात आली होती. त्याला चालवायला ड्राइवरची गरज नसणार आहे. ही तर फक्त सुरूवात आहे आजून खूप बदल या येणाऱ्या काळात दिसतील .

गणेश माशाळकर B.Sc.Biotecnology
राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles