इतिवृत्त
जीवनाचे इतिवृत्त मांडत गेले मी
आयुष्याची रोजनिशी लिहत गेले मी
कित्येक काढल्या सुखदुःखाच्या नोटिसा
रोज नवा प्रस्ताव मांडत गेले मी
माझेच मन तक्रार मांडत होते
इतिवृत्ताचा लेखाजोखा पुढ्यात ठेवत गेले मी
रोज चालले होते हास्य अश्रूंचे घोटाळे
फसवा हिशेब सांगत गेले मी
रोज छळत होता दुरावा नात्यांचा
फसवेगीरीला ठरावात मांडत गेले मी
आजही स्मरते निष्पाप ते बालपण
जगण्याची स्वार्थी कला मोडत गेले मी
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
=======