
समायोजन
प्रत्येक गोष्टीचा समायोजन
करावा लागतो समजदारीने
सामश्यांचा हल निघून
जगू शकतात आनंदाने
बुध्दी चातुर्य असून सुद्धा
अपमानीत जिवन जगतात
निर्धारीत केलेल्या वेतनावर
आपला गुजारा करतात
ह्याकडे शासनाचा नसतो लक्ष
भुक्कड संस्थावाल्यांचा बनतात भक्ष
तुटपूंज्या वेतनावर करून चाकरी
पोटभर मिळत नसतात भाकरी
वर्षानुवर्षे करून काम
कायम समायोजन होत नसतो
आर्थिक स्थिती ढासळून
तो मानसिकतेत वावरतो
तो सुध्दा एक माणूस
त्याचा विचार कोण करणार ?
विचार करणारे असतील भ्रष्ट
तर तो आजच्या स्थितीत मरणार,,!
त्याचा सुध्दा सुंदरशा असतो परिवार
त्याच्याही असतात काही मनिषा
की आपणही चांगले जगावे जिवन
अशी असते त्यांची आशा
सार्या गोष्टींचा हल काढून
समायोजन करणेच योग्य
ह्या छोट्याशा मार्गाने
उजळू शकतो त्यांचे भाग्य
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
=======