शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना..

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अक्षरयात्रा*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कळत नकळत झालो
अक्षरयात्रेचा प्रवाशी
अखंड चालला प्रवास
जुळवून घेत शब्दांशी… //

त्यांनी सहजच ऐकावी
माझी अंतर्मनाची साद
तात्काळ दाटी करावी
देण्यास मला प्रतिसाद.. //

करावी तितकी थोडी
पुन्हा पुन्हा उजळणी
लागली इतकी गोडी
दररोज नवी जुळवणी.. //

परिचित होवूनी गेले
अक्षरांचे सर्व गुणधर्म
भाव तसाच स्वभाव
जाणलेच माझेही मर्म.. //

जसा प्रसंग तसे वर्तन
नाना रस रंग परिपूर्ण
विषया नुरूप आशय
काव्य झाले अर्थपूर्ण.. //

मनी नाना भाव तरंग
अहोरात अक्षर ध्यास
चिंतने चित्त होई दंग
लेखणीस लागे आस.. //

छंद जीवा लावी पिसे
चाले साधना निष्काम
केली अशी अक्षरयात्रा
कविताच मुक्ति धाम.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*अक्षरयात्रा*

स्वर व्यंजनांना जुळवित पूर्णत्व दिले अक्षरांना
शब्दांवर स्वार होण्या भरविली अक्षरयात्रा

जिथल्या तिथे काना मात्रा वेलांटी उकारांचा भरवला बाजार अक्षरा अक्षरातून शब्दांना दिला आकार

इकडून तिकडे विरामचिन्हाने मिरवित गिरविला स्वतःचा कित्ता
वाक्यात अर्थ भरवित स्थापली त्यांची सत्ता

एकमेकां सहाय्य करीत अक्षरातून शब्द जन्मले
शब्दाशब्दांनी एकत्र येऊन वाक्य जमविले

वाक्यांचा घेत बोध मराठीत झाली अखंड साहित्य निर्मिती
काव्य,कथा, कविता यांच्यात सहज घडली प्रगती

सातत्याने करता वाचन ही अक्षरयात्रा वारंवार बहरते
माय मराठी माझी या जगती श्रेष्ठ ठरते

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

पहिल्या वर्गात असताना
अक्षरओळख झाली
अ ब क ड बाराखडी
गाडी रुळावर आली

काना मात्रा विलांटी
व्याकरण हळूहळू जमले
अक्षरयात्रा झाली सुरू
अन मी शब्दांशी जुळले

दादा ताईंचा हात धरून
मी रचना करायला शिकलो
शिलेदार समूहात आता कुठे मी
स्पर्धेत कसातरी टिकलो

करतात इथे मार्गदर्शन
इथे लहान ना मोठे
मनातून करतात प्रेम
हावभाव नसतात खोटे

आजन्म मी पुजारी
शब्द माझे देऊळ
दादा ताई देव इथे
प्रसादासाठी ठेवतो रचनेचा गुड

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

विचारांची ,भावनांची मशागत केली
अलंकारिक शब्दांचे खत घातले
अक्षरांची पेरणी छान केली
शब्दमालेत शब्द सजवले….

विश्वासाने समूहात रोप लावले
छंद जपला मनी कवितांचा
शब्दातच मन अडखळले
आनंद घेतला चारोळींचा…,.

अक्षरपेरणीचे रोप वाढले
शब्दांचे घोस त्याला लागले
मराठी शिलेदार समूहात
मानाचे व्यासपीठ मिळाले….

शब्दांची कणसे भरघोस लागली
कवितांच्या रानी विखुरली
कणसातून काव्यमोती डोकावून
शिलेदार शिरपेच्यात सामावली…..

परिश्रमांचे फळ मिळाले
सुवर्णाक्षरात लिहिले आज
“काव्यरत्न” पुरस्काराने आता
चढविला एक सुंरर साज…..

मा.राहूल सरांच्या कौतुकाने
भारावून जातेय आज
सविता ताईंच्या शब्दसुमनाने
स्वतःवरच होतोय नाज…..

वैशाली ताईंची पाठीवर थाप
मनास देते हो खास आनंद
संग्राम सरांची कौतुकसुमने
मिळवून देतात मला स्वानंद….

असाच स्नेह जपूया ह्रदयांतरी
काव्यांगणात शब्दफुले सजवूया
अक्षरांची उत्तम मशागत करूनी
सातत्याने काव्यांगणात कविता फुलवूया…..

अक्षरयात्रा निघाली ज्ञानमंदिरी
शब्दफुले वेचूया सरस्वतीमंदिरी
क, का, कि, की ची लय गाऊया
ज्ञान संवर्धन होईल वाक्य प्रसादअंतरी…

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

अ‌ आ इ ई
गिरवू अक्षर
घेऊनी आधार
बनूया साक्षर ||१||

अक्षरांचे मोल
जीवनात खूप
दाखवी सर्वांना
नवे हे स्वरूप ||२||

लिहिता वाचता
वाढे मनोबल
हळूहळू होई
साऱ्याची उकल ||३||

गुरूजी शिकवी
स्वर नि व्यंजन
अक्षरांचे मनी
होतसे गुंजन ||४||

एक दोन तीन
संख्या या वाचतो
नवा दृष्टिकोन
सदैव असतो ||५||

गुरूजी देतील
सुंदर आकार
विद्यार्थ्यांचे स्वप्न
करती साकार ||६||

ही अक्षरयात्रा
होई अशी पूर्ण
गुरूजींची साथ
लाभे परिपूर्ण ||७||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा : -*

दुनियेत अद्भुताच्या
रसाळ अक्षरयात्रा भरली
दर्जेदार लेखन पाहुन
हृदयी अक्षरे कोरली ॥

शब्दात भारी जादू होती
साहित्याने केली किमया
आम्ही वाचू धडे कविता
वाचुनी देऊ प्रतिक्रिया ॥

आनंदकंद वृत्तबद्धातील
मात्रा शेर काफिया मतला
आभाळाएवढा अर्थ सांगी
ठाव घेई रंग आणी गझलला ॥

अभंगवाणी ऐकू संताची
भजने गाऊ देवधर्मावर
पोवाडे भारूड लोककला
सादर करू जीवन चरीत्रावर ॥

एकदा संमेलन अनुभवू
विशेषांकांनी डोळे दिपवू
या रे गर्व हरूनी अक्षरयात्रेला
सुप्त लेखनगुण नका लपवू ॥

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

सरस्वतीच्या मंदिरात या
गिरवू अक्षर अक्षर
वाचू,लिहू करू ज्ञानसाधना
होऊ सुजाण साक्षर

सत्य शिवाची करू प्रार्थना
मांगल्याची कास धरू
ज्ञानमंदिरी ज्ञानामृताचे
कण वेचुनी ग्रहण करू

सुरू जाहली अक्षरयात्रा
अनुभवाचे मिळती धडे
अभिव्यक्तीला वाव आणिक
विचारांचे सौंदर्य गडे

आयुष्याच्या टप्प्यावरती
दिली शब्दांनी अमूल्य साथ
समृद्ध केले जीवनाला
भाषेनी झाला विकास

फुलू लागली लेखनी अन
उमलली काव्याची फुले
अक्षरयात्रा बहु आयामी
साहित्याचे दालन खुले

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles