शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या..

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*अक्षरयात्रा*

अक्षरयात्रा दाखवी मात्रा,
सुरुवात ही शिक्षण भाषा,
जाऊनी अक्षरांच्या गावा,
कळतो शब्दांचा कावा//

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर.*
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

सुरु झाली अक्षर यात्रा
‘श्री’ या रेखाटनापासून,
जीवनाचे मर्म सापडले
बालपनीच्या संस्कारातून.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*चारोळी–अक्षरयात्रा*

गिरवीतांना बाराखडी
अक्षराशी झाली मैत्री
ज्ञानगंगेच्या प्रवासातील
मी एक अक्षरयात्री.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*अक्षरयात्रा*

अक्षरयात्रेत भरली शाळा
शिक्षकांनी भरवली अक्षरजत्रा
अक्षर गिरवती बालवाडी ची मुले
प्रत्येकाला दिली वेलांटी मात्रा

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

वह्या पुस्तक,लेखनीची
सभा घ्यायची ठरली….
आख्ख्या दालनातच मग
अक्षरयात्रा भरली…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

अक्षरयात्रा शिलेदार समूहाची
नवीन कोडे लावी उलगडायला
विविधांगी काव्य रचनांचा मेवा
मिळतो समूहात रोज चाखायला

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🎗️✍️♾️♾️♾️♾️
*अक्षरयात्रा*

अक्षरयात्रेत सारी मुले
अक्षरकार्ड स्टाल लावू,
अक्षरे जोडून वाचनाचा
सराव करू, आनंद घेवू

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles