
समायोजन
सगळं तरी मनाजोगं कसं
होईल केलेलेच नियोजन ,
समोरील परिस्थीती पाहून
करावं लागत समायोजन..!
मिळतंजुळतं घ्यावं लागत
दोन पाऊल पुढंही जाऊन ,
कधी दोन पाऊल मागे ही
वळावं लागतंय वेळ पाहून..!
खुप तडजोड करून सुद्धा
ताळमेळ जेव्हा बसत नाही ,
स्वतः स्वतःला खात राहतं
आपलं मन ग्वाही देत नाही..!
भूतकाळ पाठलाग सोडीना
जवा भविष्यकाळ घडतांना ,
किती संयम बाळगावा तरी
जीवनी समायोजन करतांना..!
खूपदा थकून जातो आपण
विचार थैमान सुरू डोक्यात ,
अनपेक्षित घटनाही घडतात
कधी नसतातही आवाक्यात..!
तरीपण खचून नाही जायचं
झगडायच दोन हात करून ,
सामना करायचा संकटाशी
योग्य ते समायोजन घडवून..!
बी एस गायकवाड
पालम,परभणी