विश्वास
नको हातात हात
मनी विश्वास असू दे
तु बोलत असतांना
चेहरा तुझा नयनी वसू दे
तुझ्या माझ्या नात्यात
तक्रारीला स्थान नको
देशील ते स्वीकारेन मी
विश्वास मात्र कमी करू नको
होतीलही वाद कधी आपुले
असावे तुझ्याच खांद्यावर डोके
चुरघळू दे परिस्थती कितीही
तरीही घेईल मी आनंदाचे झोके
स्वप्ने तुझी माझी आहे सारखी
नको कठोर शब्दांची पेरणी
विश्वासाने करू या पूर्ण
कशाला हवी मनधरणी
खूप धैर्यवान आहे मी
अंत माझा बघू नकोस
मी जर हरवले माझ्यामध्ये
तर,स्वतःला छळून घेऊ नकोस
सीमा वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर