अदाकारी
लावण्यवतीची अदाकारी
भुरळ पाडते क्षणोक्षणी
लावणीत मजा लुटती सारी
हे जाणती सारे मनोमनी ॥
निवडुंग
निवडुंग तो बिचारा उभा वाटेवरी
त्याचेच काटे त्यांसी टोचतात
व्यंग तयाचे त्याला कळविल्यावरी
साऱ्या नजरा त्यालाच सलतात ॥
आम्ही संपकरी
आलो आम्ही संपकरी
नवी दिशा उमेद घेऊनी
सारे तुमच्या दारी
उत्कर्षाची वाट धरूनी ॥
श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.
========