परतीचा प्रवास

परतीचा प्रवास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिंहावलोकन करु सारे
मावळत्या सालभराचे
काय कमवले अन् गमवले
गणित परतीच्या प्रवासाचे

निरोप देताना स्मरण करु
सुखकारक अशा घटनांचे
बोध घेऊन करु विस्मरण
क्लेशदायक दुःखी प्रसंगांचे

देह हा अनमोल मानवा
लाव सत्कारणी सर्वांच्या
कर आठवण गतसालाची
कामी आलो मी कितींच्या

फुकेच गेले वर्ष असे हे
सल मनात का सलते ही
आतातरी कर ठाम संकल्प
व्यर्थ मी जाऊ देणार नाही

मागोवा परतीच्या प्रवासाचा
मनभेद मिटवू परस्परातील
स्नेह जुळवून नाती जपावी
वृद्धी करावी आपुलकीतील

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
========

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles