बरे नाही; दिपककुमार सरदार

बरे नाही



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खरे तेच माझे सत्यता
नाकारणे बरे नाही
गोड बोलणार्‍याचे बोल
स्वीकारणे बरे नाही.

दुसऱ्याचे एकदा
ऐकुन घे ना जरासा
वाचाळ बडबड
अंगीकारणे बरे नाही.

लगेच का येतो
हमरीतुमरीवर दोस्ता
हात असा इतरांवर
उगारणे बरे नाही.

संयम धर जरा
सबुरीने घेत जावे
मग पश्चाताप करूनी
झुरणे बरे नाही.

कळते मलाच सारे
इतरांना काही ना कळे
अहंभावात अशा
वावरणे बरे नाही.

केव्हा काय होईल
सांगता येत नाही
संकटसमयी सरदारला
विसरणे बरे नाही.

दिपककुमार सरदार
ता, लोणार जि.बुलढाणा
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles