काव्यभूषण पुरस्कार प्राप्त कवयित्री प्रतिमा नंदेश्वर यांचा सत्कार
मूल: जि प जि.प.उच्च प्राथ.शाळा,चिमढा ता. मूल जि. चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका तसेच ज्येष्ठ कवयित्री ‘प्रतिमा प्रकाश नंदेश्वर’ यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे २७ फेब्रुवारी ला यंदाचा काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
आज दि १३ मार्च रोजी जि.प.उच्च प्राथ. शाळा, चिमढा येथे मुख्याध्यापिका सौ ज्योत्सना उपलेंचवार मॅडम, शा.व्य.स.उपाध्यक्ष सौ.सपना वाकडे, विषय शिक्षक शंकर बोरकुटे सर, सहाय्यक शिक्षक, बोदलकर सर, बलकी सर, कुळमेथे मॅडम या सर्व शिक्षक वृंदाच्या हस्ते कवयित्री सौ. प्रतिमा नंदेश्वर मॅडम यांचा शाळेत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व जागर मराठीचा विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.