अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर; राज्य शासनाचे ‘मराठीचे शिलेदार’ संस्थेतर्फे अभिनंदन
नागपूर: मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी तसेच व्यवहाराची भाषा व्हावी. यासाठी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर ही समाजमाध्यमातून तसेच विविध मराठी भाषिक उपक्रमातून मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करीत आलेली आहे. मराठीला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी ही संस्था अहोरात्र काम करीत असून, राज्य शासन याकडे सकारात्मक दृष्टीने पहात असल्याचे वक्तव्य मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी नुकताच बुलढाणा येथे संपन्न झालेल्या ‘जागर मराठीचा’ या जागतिक मराठी भाषा गौरव दिनी आपल्या भाषणातून केले होते. आज (दि १३) मंत्रिमंडळ बैठकीत मराठी भाषा धोरण जाहीर करून राज्य सरकारने मराठी भाषकांना यंदाची भेट दिली असल्याचे मत अध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांचे अभिनंदन केले.