बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात 🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : धुंद मोगरा🥀*
*🍂बुधवार : २० / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धुंद मोगरा*

धुंद मोगरा तो दिसे मोहक
रोखून नजरा पाहती नाहक
लाजून चूर ऊर धडधडतो
सुगंध घेण्या का तडफडतो

गंधाची की रूपाची मोहिनी
कळेना कसे मन झाले बावरे
रोखून पाहता होई घालमेल
बहरली कशी मनी रे प्रीतवेल

शुभ्र वल्कले गंधाचा परिमळ
यौवना घालतो प्रेमाचीच गळ
मन भुलते तन झुलते आपसूक
पहिल्या भेटीची मनी धाकधूक

धुंद मोगरा बेधुंद रानपाखरू
प्रश्न पडतो यातून कसे सावरू
सावर रे मना नको गुंतू प्रेमात
वादळात विझते रे ती प्रेमवात

कातरवेळी धुंद मोगरा आठवे
प्रेमातुर यौवना दाटती आसवे
साद अंतरीची बेचैन ती कळी
घुसमट मनाची हृदयास छळी

पुनवेच्या राती जुळविली रास
नभी चांदण्या मोहक आरास
कवीकल्पना रे आली फळाला
धुंद मोगरा यौवना ती गळाला
धुंद मोगरा यौवना ती गळाला

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

चंद्र आज भेटला नी
चांदणे मी होऊन गेले
रात्रीच्या अधरावरीही
गीत प्रीतीचे फुलुन आले

क्षण सारे  मोहोरलेले
जपुनी ठेविले  अंतरात
वळेसर धुंद मोगऱ्याचा
माळलास रे मम कुंतलात

त्या सुखाच्या चाहुलीने
अंतरा या मोहवूनी
रातराणी गंधाळली
दरवळ वाहिला मनी

सरिताही जपत वाही
संथ जलाच्या तरंगी
बिंब तयाचे शीतलसे
मनी चांदव्याचे सुरंगी

आज सारी पर्णफुले
रौप्य वर्ण हा लेऊनी
शिल्प भारल्या क्षणांचे
जपती मनाच्या कोंदणी

मदहोश रात्र धुंद -फुंद
हवाहवासा नित एकांत
बेहोशी आज बहरली
विश्वाच्या या कणांकणांत

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

घराला घरपण स्त्रीच असते
अंगणात शोभा फुल झाडांच
प्रसन्नतेची लहर सुवासिक
मनात मोहर धुंद मोगऱ्याच

होता तोवर झाडांवर तो
टवटवीत दिसती फांदीवर
आकर्षीत होऊन जाई मन
न्याहाळत त्या मोगऱ्यावर

सकाळ प्रहरी सुर्याची किरण
पडताच कळी उमले हसुन
बघताच नजर तिच्यावर
फुलले अंगण हे सुगंधान

जीवनगाणे तिच्या सोबतीने
गाते गोड गाणी मधुर
जीवन वाटे आनंदीत
दुःख सारले आले सुखाच वार

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंद मोगरा*

सांज होता
नुस्ता दरवळ
धुंद मोगरा
झाला परिमळ…१

अबोल प्रीत
न्हाली चांदण्यात
पहिल्याच भेटीत
खुलली अंतरात…२

गंधाची मोहिनी
मन झाले बावरू
प्रीत यौवनाची
झाली रानपाखरू…३

मंदमंद वारा
झोंबतो अंगाला
धुंद मोगरा
केसात माळला…४

कातरवेळी
झाला इशारा
लडिवाळ नखरा
छेडतो,हृदयातील कोपरा…५

धुंद हा मोगरा
घेई हृदयी आसरा
देही नाचतो सारंग
त्याचा,कसा आवरू पसारा….६

*श्री. काशीनाथ पैठणकर सर*
*नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*”धुंद मोगरा”*

धुंद मोगरा अंगणी फुलला
मोहून गेले मन माझे
प्रभाती क्षण बहरून आले
सुगंधी प्रसन्न ताजे…..१

परसदारी माझ्या अंगणी
बाग फुलझाडांची
उमलणार्‍या कळ्याकळ्यांवर
झुंबड फुलपाखरांची…..२

जाई,जुई,चमेली,गुलाब
सोनचाफा अन् सदाफुली
शेवंती,झेंडू जास्वंद,अन्
सुंदर साज ल्याली अबोली….३

धुंद मोगरा मोहिनी घाली
येता जाता सकळांसी
वेड लावी मनास त्याचा
सुगंध दरवळ भूमीसी….४

रम्य प्रभाती नटूनथटून
सामोरी येते जेव्हा घरवाली
केसांच्या बटा भाळावरी
अंबाड्यात गजरा मखमली….५

लावण्य लतिका शोभून दिसते
अप्सरा जणू इंद्राची
मधुर हास्य वदनावरती
तुलना नको चंद्राची….६

असा धुंद मोगरा लाभो
सहवास त्याचा जीवनभर
प्रवास सोबतीचा आमचा
स्वार आनंदाच्या लाटेवर ….७

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

माळलास तू केसात गजरा..
आनंदाने दरवळे धुंद मोगरा…

जमली जोड सौंदर्याची अन् ,
पाहूनच तिचा चेहरा लाजरा…

झाली गट्टी काळ्या केसाशी,
पांढराशुभ्र शोभतोय गजरा…

उडती केस भुरभूर वाऱ्यावर,
दरवळतो सुगंध हवेत सारा…

लांबसडक ते केस मखमली,
त्यावर राज करी धुंद मोगरा…

तुझ्या सहवासात रमून जाई,
वेळ घालवीतो लाजून मोगरा…

जादुई कांडी धुंद मोगऱ्याची,
कळी उमलते रंग तो पांढरा…

सुगंधित होई परिसर भोवती,
शोधित तुला फिरतोय भ्रमरा…

पाहून निखळ सौंदर्य सखीचे,
भोवताली फिरे जणू भोवरा…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

दरवळला आसमंत
प्रितीचा किनारा
फुलला बहरला वसंत
झोंबे शीत वारा

शांत सागर
बहरली कातरवेळ
हात हाती तुझा
क्षण अनमोल

क्षण हे बहरले
हसले गाली
लाजून आवेगे
फुलली लाली

शुभ्र चांदणीरात
मंद मंद वारा
अलगद फुलांचा
गजरा माळला

हरवले भान
हरखून क्षण
धुंद मोगरा
बावरले मन

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles