बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : धुंद मोगरा*🥀
*🍂बुधवार : २० / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धुंद मोगरा*

*धुंद मोगरा गं केसात माळला*
*हळूच माझ्या गं कानी वदला*
*सख्याचा स्पर्श चमकून गेला*
*प्रीतीचा पाझर दाटूनी आला*

*प्रा.विलास चौगुले (सर)*
*दौंड,पुणे.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

मोसमात बहरली, फुलांची बाग
केसात,माळला सुगंधी गजरा,
थाटात उभा, पांढराशूभ्र, धुंद मोगरा
वळून पाहती,लोकांच्या नजरा.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

धुंद मोगरा आज आपल्याच नादात
माळले कुणी त्यास प्रेयसीच्या कुंतलात
वाऱ्यावरती पसरली वार्ता फुलांफुलात
जागृत झाली ईर्षा सर्व सुमनात

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

धुंद मोगरा मनात भरला
बेहोष झाले मादक गंधानी
भावूक नखरा मनी ठसला
मोहक सुबक धुंद मोगऱ्यानी ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंद मोगरा*

गंधाळला धुंद मोगरा
सुखकर स्पर्श त्याचा
मनाला देई प्रसन्नता
क्षण अविस्मरणीय तो प्रेमाचा

*संजय गायकवाड*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

आज माझ्या प्रियेच्या
वेणीत माळला गजरा
पाहून सौंदर्य तिचे ते
झाला प्रेमात धुंद मोगरा

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

गंधित आसमंत
धुंद मोगऱ्याने केला
केसात माळलेला गजरा
भाव खाऊन आज गेला

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

तिच्या प्रेमात तो धुंद मोगरा झाला
खळखळनारा आनंदी झरा झाला
ती झाली कधी नजरेआड त्याच्या
तर कितीदा कावराबावरा झाला

*मोहिनी निनावे*
आनंद नगर, नागपूर .
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

धुंद मोगरा होता कि
गंधाळला श्वास होता
निरोप घेतांना सखे तू
घेतला आनंदात निश्वास होता

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🪸🍁➿➿➿➿
*धुंद मोगरा*

पसरवी सुगंध वाऱ्यासंगे
बसुनी वेणीत धुंद मोगरा
लाजून मुरडून पाहे प्रियास
जुळता दोन्ही नजरेस नजरा

*सौ. वनिता महादेव लिचडे*
त.पवनी, जि.भंडारा
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles