जि.प. मोरगाव शाळेचा वरद नरेश प्रधान नवोदयसाठी पात्र

जि.प. मोरगाव शाळेचा वरद नरेश प्रधान नवोदयसाठी पात्र



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया/ अर्जुनी मोर: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथील इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत असलेला वरद नरेश प्रधान यांची सन २०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत उत्तुंग यश मिळवून वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी निवड निश्चित झाली आहे .

वरद प्रधान हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा असून, शैक्षणिक क्षेत्रातल्या कौशल्या बरोबरच , अटल क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर उंच उडी स्पर्धेत सुद्धा अव्वल स्थान प्राप्त केलेले होते. वरदचे वडील हे ग्राम दाभना येथील रहिवासी असून ,ते जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांची आई लीना नरेश प्रधान ह्या ग्रामपंचायत दाभना च्या सरपंच पदावर आहेत.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जेदार अध्यापन याची जाणीव ठेऊन, सदर सुजाण पालकाने ,मोरगाव येथील शिक्षकांच्या कर्तव्यदक्षतेवर विश्वास ठेवून, ग्राम मोरगाव येथे पाल्यांचा प्रवेश निश्चित केलेला होता. त्याची अपेक्षित फलश्रुती ;नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे निवडीने मिळाल्याचे; पालकांनी मनोगतातून व्यक्त केले. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव ही सन २०२२-२३शैक्षणिक क्षेत्रामध्ये अदानी फाउंडेशन च्या वतीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेले होते.

सन २०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविलेले आहे. त्याचबरोबर सन २०२३-२४या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एन. एम. एम. एस. या परीक्षेत सुद्धा सदर शाळेचे दहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून, सदर शाळेच्या यशाची परंपरा टिकून आहे. सदर शाळेत परिसरातील अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशाचे निश्चित केलेले असल्याने सध्या तालुक्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळखले.

गुणवत्ता सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापक सौ .रेखा विजय गोंडाणे यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे. शाळेचे पदवीधर शिक्षक सु .मो. भैसारे, विषयी शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे, जे. एन. ठवकर ,वामन घरतकर ,अचला कापगते, रूपाली मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोधी, सरपंच गीता ताई नेवारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे आदींनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles