भंडारा लोकसभा बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांना मुनीश्वर काटेखाये यांचा पाठींबा
काटेखायेंनी घेतला अर्ज मागे; कुंभलकरांचा करणार जाहीर प्रचार
भंडारा: भंडारा – गोंदियात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही चुरशीची होणार असून, पवनी तालुका राईस मिल असोशिएसनचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच मुनीश्वर दौलत काटेखाये यांनी बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेत बसपा बैठकीत जाऊन जाहीर पाठिंबा देत लोकसभा क्षेत्रात त्यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले,