गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेची रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : चर्चा खुर्चीची🌤️*
*🔹गुरूवार : ०४ / ०४ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १२४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

ना नितीमत्तेची
ना विकासाची
नेत्याच्या मनात
चर्चा फक्त खुर्चीची

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

यंदा निवडणूकीचे वेगळेचे वारे
चर्चा खुर्चीची करतात नेतागण सारे..
बदला बदलीच्या राजकारणामुळे
विमनस्क अवस्थेत मतदार बिचारे…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

निवडणुकीचे आले
सुसाट वादळ वारे
चर्चा खुर्चीची करती
राजकारणी सफेद बगळे

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

डोहाळे निवडणुकीचे
आजी माजीना लागले
चर्चा खुर्चीची ते सारेच
आपल्या बाजूने करू लागले

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

खुर्चीसाठी होतो पक्षबदल
खुर्चीचाच फक्त एक ध्यास
निवडणूक येता चर्चा खुर्चीचीच
कोण करणार ,कसा होईल विकास?

*चारू अविनाश झरे*
*वाशिम*
*©सदस्या* *मराठीचे* *शिलेदार* *समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

कोण येणार कोण येणार..
आडाखे बांधणे झाले सुरू
चर्चा खुर्चीची अशी रंगली
सगळे मागचे लागले विसरू

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

निवडणुकीचे सुटले वारे
जिकडे तिकडे चर्चा खुर्चीची
गाव विकासाच्या नावाखाली
फसवणूक करतात जनतेची

*संगीता रामटेके पाटील गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

कोण बसणार या खुर्चीत
चर्चा खुर्चीची रंगली पुढा-यात
कोणीही बसले तरी खुर्चीत
फरक नाही गरीबांच्या आयुष्यात

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

देशाची लोकशाही चालली
राजकारण्यांच्या मर्जीची…
देशहिताचे भिजत घोंगडे
इथे फक्त चर्चा खुर्चीची…

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*चर्चा खुर्चीची*

रंगली चर्चा खुर्चीची
आता गल्ली ते दिल्ली
सावध व्हा मतदारांनो
तुमच्याच हातात किल्ली..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles