‘तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण मागू नका; चंद्रशेखर बावनकुळे

‘तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण मागू नका; चंद्रशेखर बावनकुळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नाना पटोलेच्या वक्तव्यावर खरमरीत टीका_

नागपूर: राजकारणात निवडणुकीचे वारे कधी कुणाचे कान फुकतील सांगता येत नाही. अकोल्यातील विद्यमान खासदार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. निवडणुकीत त्यांचे व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय धोत्रे यांचे नाव न घेता गुरुवारी केले. आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत शब्दांत टीका केली आहे

नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

पुढे नाना पटोलेंना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नका, कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका, अशा तिखट शब्दांत बावनकुळे बोलले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles