भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संमेलन

भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संमेलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी लढा

खासदार डाॅ मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

पुणे: कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुणे येथे एक संमेलन भरवण्यात येत असून अखिल भारतीय ठेका संघ (Contract) आणि मजदूर संघाच्या वतीने देशभरातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील स्टील, रेल्वे, बॅंक, खाण , ऑइल कंपन्या, विजमंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, संरक्षण विभाग, पेट्रो केमिकल, सिमेंट-खते-जहाज बांधणी व बंदरे तसेच, ईंजिनीयरींग आणि खाजगी क्षेत्रात सुध्दा कंत्राटी हजारो कामगार कार्यरत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार असून त्यामध्ये कमीशन रक्कम काढून घेणे, फंड, ग्रॅच्युईटी न मिळणे, विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ न मिळणे ईत्यादी गोष्टींवर विचारविनिमय करून देशातील कामगारांच्या समस्या या संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडण्यात येणार आहेत.

मजुरीच्या दराची सुरक्षितता, नोकरीची हमी व सामाजिक सुरक्षितता हे तीन महत्वपूर्ण मुद्दे घेऊन कंत्राटी कामगारांच्या हितार्थ भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि.6 व 7 एप्रिल 2024 शनिवार व रविवार रोजी पुण्यात “सौदामिनी सभागृह”, सदानंद नगर, स्वरूप वर्धिनी परिसरात हा संमेलन कार्यक्रम होईल.

राज्यसभा खासदार, डाॅ मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन , अखिल भारतीय ठेका संघाचे अध्यक्ष व्ही राधाकृष्णन, राष्ट्रीय सेक्रेटरी वेलु राधाकृष्णन, प्रदेशाध्यक्ष श्री अनिल ढुमणे, कायदेशीर सल्लागार ॲड. प्रभाकर धारिया, विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात ईत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून विविध राज्यातील कंत्राटी कामगार व संघटनेचे पदाधिकारी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहीती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles