शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : शेतसारा*☄
*🍂शनिवार : ०६ / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शेतसारा*

शेतसारा म्हणजे शतक-याचा संसार
केलंय अधिराज्य शतकऱ्याने मनांवर
सातबारा कोरा शेतकऱ्यांचा कसा होणार
पीक पाणी उरलं केवळ उताऱ्यावर

*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

*कधी अवर्षण कधी अतिवृष्टी*
*हवालदिल पोशिंदा हा बिचारा*
*प्रपंच सावरता होते दमछाक*
*भरेल कसा सांगा हो शेतसारा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शेतसारा*

*माझा कष्टकरी शेतकरी राजा*
*राब राबतो दिनरात शेतावरी*
*संकट आले कितीही पिकावरी*
*शेतसारा वेळेत भरतो शासन दरबारी*

*विकास गोपाळ खराते*
*किल्लारी लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

संसाराच्या रगाड्यात
आई नित्य भरत असते
स्वकष्टाचा शेतसारा
त्यातच तिला सुख वाटते ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

स्वातंत्र्य पूर्व काळात शेतीवर
कर म्हणून शेतसारा भरायचे
बदल तसा फार झाला नाही
मालाचा भाव कमी कराचे

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

बळीराजा मेहनत करतो
स्वतः उन्हा तान्हात राबतो
सावकाराच्या कर्जाचा भार
घाम गाळून शेतसारा भरतो

*सौ पुष्पा डोनीवार,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

*आई शेतात काबाडकष्ट करुन*
*दरवर्षी पूर्ण शेतसारा भरायची,*
*संसारात नियमित बचत करुन*
*अगदी सुंदर नियोजन करायची.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर,चोपडा
ता.चोपडा, जि.जळगांव
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🙏🍁➿➿➿➿
*शेतसारा*

नापीकी झाली तरी
भरावा लागतो शेतसारा
सहन करतो बळी
दुष्काळाचा मारा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles