गुढीपाडवानिमित्त सिद्ध साक्षी आनंदधाम येथे मोफत औषधी वाटप

गुढीपाडवानिमित्त सिद्ध साक्षी आनंदधाम येथे मोफत औषधी वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा चे डॉ.अक्षय कहालकर यांचा पुढाकार_

किटाळी : साकोली जवळच्या किटाळी/बरडकिन्ही येथे शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा संचालित “सिद्ध साक्षी आनंदधाम आश्रम किटाळी” येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दि.09/04/2024 ला सकाळी 07 ते सकाळी 10:00 या वेळेत मोफत औषध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गुढीपाडवा भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष असून त्याची सुरुवात “नवा संकल्प,नवा निर्धार” करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवस एक मुहूर्त असतो, या दिवशी कडुलिंबाचा कोवळी पाने, कडुलिंबाची फुले (मोहोर), हिंग, ओवा, मिरी, जीरा,सैंधव नमक हे सर्व एकत्र करून वाटून घेऊन त्याची गोळी तयार करून उपाशीपोटी खायची असते. त्यानंतर किमान दोन तास काहीही खायचं प्यायचं नसते. तयार केलेली ही औषध गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्ल्याने वर्षभर रोगप्रतिकारक शक्ती शरीरामध्ये कायम राहत असते, शरीर निरोगी व बळकट राहून अनेक व्याधी नष्ट होतात.

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशीचे संस्थापक श्री. डमदेवजी कहालकर यांच्या आजोबापासून ते आजपर्यंत ही परंपरा अविरत चालू असून दरवर्षीच गुढीपाडव्याच्या दिवशी हजारो भाविकांना औषधांचे वाटप करण्यात येतो व त्यांना रोगापासून मुक्त करण्यात येतो. यासाठी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा प्रेषिता कहालकर, उपाध्यक्ष डॉ.अक्षय कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, सदस्य रामदास कामथे, नरेश टिचकुले, बासुरी वादक पालिकचंद बिसेन आदी पुढाकार घेऊन गुढीपाडव्याला औषध वाटप करणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात पालिकचंद बिसेन बासरीवादक यांच्या बासरी-तबला वादनाने होईल, तसेच सकाळी भजन व सामुदायिक प्रार्थनेने भंडारा जिल्ह्यातील व परिसरातील उपस्थितांना उपाशीपोटी औषध वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त जनतेने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्ध साक्षी आनंदधाम आश्रमाचे संस्थापक डमदेव कहालकर महाराज यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles