भंडारा जिल्हा पणन विभागाचे शेतकऱ्यांना ‘या’साठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

भंडारा जिल्हा पणन विभागाचे शेतकऱ्यांना ‘या’साठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय मेश्राम प्रतिनिधी

भंडारा : जिल्हा पणन विभागाचे वतीने शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२३-२४ करिता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी.

शेतकरी बांधवांनी ३० एप्रिलपर्यंत उन्हाळी धान खरेदीसाठी पूर्वतयारी म्हणून धान खरेदी संस्थांकडे कागदपत्र सादर करावी. धान खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

जिल्हा पणन महासंघाच्या ‘अ’ वर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये दधान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे- जमिनीचा ऑनलाइन सातबारा उतारा, नमुना ८, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाइल क्रमांक आणि आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगामामध्ये धान खरेदी करता येईल.

_शेतकऱ्यांनी येथे करावी नोंदणी_

भंडारा सहकारी धान्य गिरणी कारधा, भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघ भंडारा- केंद्र धारगाव, दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी वाकेश्वर, मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ मोहाडी, मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ मोहाडी- केंद्र मोहगावदेवी, तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर- केंद्र हरदोली, दि सिहोरा को. ऑप. राईस मिल, सिहोरा, तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लाखनी केंद्र सालेभाटा, तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लाखनी- जेवनाळा, दि पिंपळगाव सहकारी राईस मिल पिंपळगाव, दि जवाहर सहकारी भात गिरणी लाखोरी, दि भगिरथ सहकारी भात गिरणी मुरमाडी (तुप), आदर्श सहकारी राईस मिल सानगडी, श्रीराम सहकारी भात गिरणी साकोल, श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली- केंद्र विर्शी, विजयलक्ष्मी सहकारी राईस मिल सोसायटी लाखांदूर, दि पंचशील सहकारी धान गिरणी मासळ, पवनी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती पवनी केंद्र वाही, पवनी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती पवनी- केंद्र कोदुर्ली, दि किसान सहकारी तांदूळ गिरणी चिचाळ.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles