माझी पाककला ‘करवंदाचे लोणचे’

माझी पाककला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

करवंदाचे लोणचे

साहित्य -एक किलो करवंद, १००ग्रॕम मोहरीची डाळ, एक मोठी वाटी साखर, १००ग्रॕम मीठ, २५ग्रॕम कच्च्या सोपेची पूड, १००ग्रॕम सुहाना लोणचे मसाला, २००ग्रॕम तेल, दहा ते पंधरा लसूण पाकळ्या.

कृती- करवंद बत्त्याने ठेचा व हाताने तुकडे करा. त्यात मीठ, साखर घालून दोन दिवस ठेवा. छान रस्सा सुटेल. आता कढईत तेल गरम करा. लसणाच्या पाकळ्या टाकून लाल होऊ द्या. गॕस बंद करा. मोहरीची डाळ तेलावर भाजून घ्या तेल गार झाल्यावर त्यात मोहरीची डाळ, सोप पावडर, लोणचे मसाला घाला. गार झाल्यावर करवंदात ओता. नीट कालवून बरणीत भरा.

टीप- करवंद हलक्या हाताने ठेचून तुकडे न करता अख्खेही ठेवता येतील.

मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles