बाप माझा पांडुरंग; पैठणकर सर

बाप माझा पांडुरंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नांगराचा फाळ,वाजे पांभरीची आरी
कष्टाच्या भक्तीत, चाले निरंतर वारी
मातीत होऊन दंग,माया पिकावर करी
बाप माझा पांडुरंग,शेतं त्याची पंढरी….१

कांदा मुळा भाजी,अवघी त्याची विठाई
कष्टाचा पिकवून मळा,अवघा झाला हरी
हाती मोटनाडा, पाणी बिजाकुंरास देई
बाप माझा पांडुरंग,शेतं त्याची पंढरी…२

अबीर गुलाल लावून घामाचा कपाळी
ओल्या सुक्यात ही,मातीवर प्रेम करी
सरसरीत मुरून,अवघी पंढरी व्यापली
बाप माझा पांडुरंग,शेतं त्याची पंढरी…३

जगाचा पोशिंदा,साऱ्यांचा कनवाळू
पारायणे चाले त्याची बांधा मेरावरी
मिळेल हमीभाव,आहे तो स्वप्नाळू
बाप माझा पांडुरंग, शेतं त्याची पंढरी…४

याच्या पंढरीत कापसाच्या राशी
तरी तो उघडाचं उभा विटेवरी
बांधावर उभी त्याची रुखमाई
युगानुयुगे दिसे लंकेची पार्वती…५

सरसरीत मुरून,अवघी पंढरी व्यापली
बाप माझा पांडुरंग, शेतं त्याची पंढरी||

पैठणकर.के.आर
जि.नाशिक
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles