अधुरी आशा; संग्राम कुमठेकर

अधुरी आशा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाहवा माझ्या सौदंर्याची
घरीदारी व्हायची सदा
नव्हत्या मोकळ्या वाटा
भाऊ ऐकवी शब्दगदा

खुलू लागलं रूप माझं
तारूण्याच्या उंबरठ्यावर
न्याहाळत्या त्या नजरांनी
वेळीच आले मी भानावर

स्वच्छंदीपणाला प्रतिबंध
आपसूक बसला घरातून
फेरफटका मारायचं मन
बहरलेल्या रानावनातून

स्वप्नं रंगविली संसाराची
बनून स्वप्नातली राजपुत्री
एकटीच घरात असताना
तुटून पडली वासनांध कुत्री

क्षणात स्वप्नांचा त्या चुराडा
जगण्याची ना राहिली आशा
गतप्राण तनावर लांडग्यांनी
पुर्ण केली रे अधुरी आशा ?

निरोप घेतला जगाचा जरी
प्रश्न अजूनही हा अनुत्तरीत
मायबहिण दिसत नाही का ?
लिंगपिसाटांना सुंदर नारीत

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles