माणूस म्हणून जगताना; डॉ नझीर शेख

माणूस म्हणून जगताना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मनात प्रेमाचा वास असावा
माणूस म्हणून जगताना॥
कुणाचाही दुस्वास नसावा
माणूस म्हणून जगताना॥॥॥॥

कुणाचेही दुःख पाहून
काळीज पाझरावे॥
कारुण्याचा झरा अविरत झरावा
माणूस म्हणून जगताना॥॥॥॥

नको कुणाचा द्वेष अन
नको कुणाची ईर्षा॥
असूयेचा लवलेश नसावा
माणूस म्हणून जगताना॥॥॥॥

अडल्यानडल्याच्या कामी यावे
गरजूला सहकार्य करावे
वृथा दुराभिमान नसावा
माणूस म्हणून जगताना॥॥॥॥

क्षणभंगूर हे जीवन
इतरांच्या कामी यावे॥
परोपकाराचा ध्यास असावा
माणूस म्हणून जगताना॥॥॥॥

डाॅ. नझीर शेख राहाता
जि अहमदनगर
=============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles