या शाळेला विसरू नकात; शर्मिला देशमुख

या शाळेला विसरू नकात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

येतात पाखरे जातात पाखरे
यशाची शिखरे चढ करण्यासाठी

असतात इथे तोपर्यंत अगदी आमचीच असतात
शिक्षणासाठीच नव्हे तर सुख दुःखातही सामील होतात

अगदीच समजावले प्रेमाने तर प्रत्येक गोष्ट समजतात
कधी रागावले तरी पटकन विसरून जातात

मनाच्या कप्प्यात आपसूकच एक घर बनवतात
येतो जेव्हा निरोप समारंभ
……आठवणींचे भांडार बनतात

प्रत्येक वेळी असेल वेगळा तरीही एकच अनुभव येतो
माझे विद्यार्थी छानच आहेत शब्द आपोआप निघून जातो

विद्यार्थ्यांपासून लेकरांपर्यंतचा प्रवास माझ्या नकळत ती करतात
जेव्हा जातात ना ती सोडून… फक्त आठवणी ठेवून जातात

जा बाळांनो, जाण्याचे तर दु:ख आहेच मनी
पण जाल तिथे यशस्वी व्हाल याचीही वाटते हमी

शिक्षण दिले, शिस्त दिली.. जमेल तसे संस्कारही दिले
ही शिदोरी कायमची राहू द्या सोबत जरी कुठेही तुम्ही गेले

पुढे जाताना कधीच मागे पाहू नकात
कधी वाटलेच रिकामे तर या शाळेला विसरू नकात….
या शाळेला विसरू नकात……

शर्मिला देशमुख घुमरे
ता केज,जि.बीड
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles