इलेक्शन आले हो
बिगुल वाजला प्रचाराचा
भेटीगाठी, वाढू लागल्या,
श्रेयवादाच्या लढाईमध्ये
सभांच्या,मैफिली रंगल्या.
सत्ताधारी आणि विरोधीपक्ष
मतदारांना,भेटू लागले,
मी कसा,आहे योग्य नेता
हें समजून सांगू लागले.
आमणे सामने,जेव्हा येतात
शब्दाच्या, चकमकी उडू लागल्या,
भाषा, खालच्या स्तरावर जाऊन
अर्वाछ शिव्या, ऐकू येऊ लागल्या.
मतदार राजा,ओळख स्वतःला
नको जाऊ,भुलथापेच्या आहारी,
नको,दावणीला बांधू तुझं अनमोल मत
आठव,तुझी केलेली बेजारी.
क्षणिक, तुला भावूक करतील
तुझ्या घरच्यांना,घेतील विकत,
पंचवार्षिक निवडणूकित, येंदा
गड्या,दाखव तूझ्या, मतांची किंमत.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी