डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यावर फुले-आंबेडकर-सावरकर यांच्या विचारांचा पगडा

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यावर फुले-आंबेडकर-सावरकर यांच्या विचारांचा पगडा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

डाॅ.मधुसूदन घाणेकर हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील
नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. 300 विश्वविक्रम,विश्वमहात्मा तसेच परब्रम्हर्षी यासारख्या सर्वोच्य आंतरराष्ट्रीय उपाध्यांनी
सन्मानीत, जागतिक पातळीवर टाॅप 10 मधे गौरवलेले एकमेव विश्वविक्रमवीर, 150 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा-साहित्य संमेलनांचे अध्यक्ष,भारतासह 17 देशात सबकुछ मधुसूदन ह्या एकपात्री कार्यक्रमांचे विश्वविक्रमी 79,000 हून अधिक प्रयोग,225 प्रकाशित पुस्तके , 1963 पासून शीळवादनासह एकपात्री क्षेत्रात कार्यरत, हिंदी चित्रपट गीत. गायन-लघुपट-ज्योतिष- साहित्य-व्यंगचित्र-अनुबोधपट- व्यंगचित्र-संपादन आदि सर्वच क्षेत्रात विश्वविक्रम, ‘ रेग्युलस ‘ता-यास ‘ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा ‘ नामकरण…असे विविध पातळीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यासारखी कर्तृत्ववान व्यक्ति या दुनियेत दुर्मिळच म्हणावी लागेल !!!

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चिंचवड नजीक ताथवडे गावी दत्त संप्रदायी कुटुंबात 18 ऑगस्ट 1955 रोजी झाला.गावी पवना नदीकाठी घर, आजोबांनी 1915 मधे बंधलेले दत्तमंदिर, झाडांचा नदीकाठ, कानावर रोज पिंपळाच्या पानांची सळसळ,पक्षांची किलबिल..विहिरीवर मोट, शेतातील पाटातून जाणारे पाणी..अशा नैसर्गिक वातावरणामुळे त्यांच्यातील उपजत प्रतिभेची, कल्पकतेची मशागत झाली..आणि त्याचीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची परिणीती ‘सबकुछ ‘डाॅ.मधुसूदन घाणेकर. दत्तसंप्रदायी घराणे, गावात रामनवमी, नृसिंह जयंती, हनुमान जयंती, गोकूळ अष्टमी यांसारखे सामुदादिक उत्सव, दरवर्षी दत्तमंदिरात दत्तजयंती या सर्वच वातावरणामुळे डाॅ.घाणेकर यांच्यावर सामाजिक समरतेचे संस्कार होत गेले. बहुजन समाजाविषयी बालपणापासुनच ओढ वाढत गेली.1965 ते 1967 संघाशी जोडले गेले.पुढे नोकरीत भारतीय मजदूर संघाच्या कार्यातून राष्ट्रहित म्हणजे काय याविषयी सक्रिय संकल्पनेची बीजं खोलवर मनात रुजली गेली..साहित्य,ज्योतिष, एकपात्री कार्यक्रम,हस्ताक्षर मनोविश्लेषण, रेकी, संमोहन अशा अनेक क्षेत्रात प्रभाव वाढत असताना एकीकडे ‘ समाजाकडून आपल्याला काय मिळेल यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकू ? ‘ तसेच ‘राष्ट्रहित ‘प्रथम , विश्वकल्याणाची संकल्पना साकारण्यासाठी खारीचा वाटा म्हणून भारतासह अनेक देशात विश्वजोडो अभियान…या सर्वच गोष्टीतून ‘ कार्यमग्नता हेचि जीवन ‘ या ब्रिद वाक्याचा ध्यास घेऊन डाॅ.मधुसूदन घाणेकर जवळ जवळ 60 वर्ष सामाजिक, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर काही दशकं आपले सातत्याने योगदान देत आहेत.

बालांपासून अबालांपर्यंत सर्वांना आनंद देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. वीज मंडळात नोकरीत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून मृत कर्मचा-यांच्या पत्नी / मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. महिला ज्योतिर्विदांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे म्हणून ‘ महिला ज्योतिर्विद ‘ संस्था स्थापन केली..संस्थापक या नात्याने या संस्थेसाठीही 2009 पासून स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कवयित्रींसाठी ऑनलाईन संमेलन घेतले. साहित्य, कला, संगीत, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच पातळीवरील महिलांना हक्काचे व्यासपीठ म्हणून ‘वर्ल्ड लिटरेचर ‘ हे खास महिलांसाठी संघटन उभे केले.

डाॅ.घाणेकर यांनी अनेक संस्था उभारल्या. माजी विद्यार्थ्यांचे संघटन उभारले.साहित्य ,ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण यासंदर्भातही संस्था उभारल्या. राजकीय क्षेत्रात सांस्कृतिक पातळीवरही संघटन उभारले आहे . रेकी, संमोहन तंत्राच्या माध्यमातून अगणितांना दिलासा देण्याचे कार्य सुरु केले.डाॅ.घाणेकर यांना स्वतःला 500 पुरस्कार मिळाले, पण डाॅ.घाणेकर यांनी आत्तापर्यंत हजारो गुणवंतांना निरपेक्षपणे सन्मानीत केले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर शीळवादकांचे ‘ व्हिसल वर्ल्ड ‘ संघटन उभे केले.त्यांच्याच अध्यक्षतेखाली पहिली आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे.त्यांनी युवकांच्या उत्कर्षासाठी ‘युनिव्हर्सल युथ ‘ संस्था उभी केली आहे. मधमाशी वाचवा अभियानासाठी ‘ वर्ल्ड क्विन बीज’ संस्था उभारली. आणि आता ‘महिलांचा विकास:राष्ट्राचा विकास ‘ या सदभावनेतून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी’महिला सन्मान’ ही संस्था स्थापन केली असून प्रातिनिधिक स्वरुपात काही कर्तबगार महिलांचा सन्मानही डाॅ.घाणेकर या संस्थेच्या माध्यमातून करणार आहेत. या त्यांच्या झंजावती वाटचाली बाबत एकच म्हणावेसे वाटते की डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यावर विवेकानंद -फुले-आंबेडकर – सावरकर यांच्या विचाराचा पगडा कायमआहे. त्यांच्या या अखंड सत्कार्यास हार्दिक शुभेच्छा !

सौ.वसुधा नाईक
अध्यक्ष
वसुधा इंटरनॅशनल
———

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles