“ऐश्वर्य कट्टयावर रंगली धमाल” ; राजकारण ते संगीत विविध विषयांचे सादरीकरण

“ऐश्वर्य कट्टयावर रंगली धमाल” ; राजकारण ते संगीत विविध विषयांचे सादरीकरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: प्रसिध्द उद्योगपती श्री. बिपीन मोदी यांचे गीत गायन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर कार्याध्यक्ष श्री. प्रदीप
देशमुख यांचे राजकीय वाटचालीतले बहारदार किस्से आणि इतिहास अभ्यासक व ज्योतिषी जगन्नाथ लडकत यांनी वर्तविलेले राजकीय नेत्यांचे भविष्य अशाप्रकारे राजकारण ते संगीत अशा विविध विषयांनी यावेळचा ऐश्वर्य कट्टा धमाल रंगतदार झाला.

मान्यवरांनी आपल्या आयुष्यातील वाटचालीचा पट उलगडला. आपले प्रारब्ध आणि आयुष्यातील घडामोडी यांचा संबंध उलगडून सांगताना लडकत गुरुजींनी राजकीय क्षेत्रातील अनेकानेक मान्यवरांचे आपण वर्तवलेले भविष्य कसे खरे ठरले आणि येणाऱ्या काळात एकूण राजकीय परिस्थिती याबद्दल अभ्यासपूर्ण भाष्य केले. महापराक्रमी पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या विलक्षण कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेऊन शिंदेशाही पगडीच्या गौरवाचा इतिहासही त्यांनी कथन केला. बिपीन मोदी यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सांगताना आपल्या जीवनातील महत्वपूर्ण व्यक्तींचा कृतज्ञतापूर्वी उल्लेख केला. विद्यार्थी चळवळीपासून आजपर्यंत विविध प्रकारची जनआंदोलने यांची रंजक व प्रेरक वेध घेताना प्रदीप देशमुख यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये केलेले धडाकेबाज आंदोलन, ऐन पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यात खरी बोट नेऊन महापालिकेसमोर केलेले आंदोलन यांच्या धमाल आठवणी सांगितल्या. सुभाष मोहिते यांनी आपल्या व्यावसायिक वाटचालीतील अनुभवांचे कथन केले.

लोकसभेच्या निवडणुकांची राजकीय धुळवड देशभर सर्वत्र जोरदार रंगली असताना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे वर्तवलेले निवडणुक भविष्य, राजकीय जीवनातील मनोरंजक किस्से यांनी हास्यकल्लोळात बुडालेल्या श्रोत्यांना श्रवणीय गीतसंगीताची मेजवानी आणि व्यावसायिक जीवनाची समृध्द अनुभव यांना श्रोत्यांनी.प्रचंड प्रतिसाद दिला. संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शंखनादाच्या पार्श्वभूमीवर औक्षण करण्यात आले. मानाची शिंदेशाही पगडी, शाल, मोत्याची माळ, “आरोग्यसाथी” पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पराग पोतदार, रवींद्र संचेती, युवराज रेणुसे, दिलीप जगताप, सचिन डिंबळे, नेमीचंद सोळंकी, सर्जेराव शिळीमकर, आकाश वाडघरे, संदीप फडके, मंगेश साळुंखे, रोहित रेणुसे,मनोज तोडकर, शिरिष चव्हाण आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार व ऐश्वर्य कट्टयाचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles