न.प.शाळेत महामानवाला अभिवादन
मोहपा : स्थानिक नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोहपा येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दिनी त्यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिताली गणोरकर, मुख्य अतिथी म्हणून किर्ती कावळे, उर्मिला बोराडे, मुख्याध्यापक मोहन चतूर, ज्येष्ठ शिक्षक अशोक लोणकर, प्रदीप विघ्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र व कार्यावर मोहन चतूर, अशोक लोणकर, प्रदीप विघ्ने यांनी प्रकाश टाकला.मिताली गणोरकर, किर्ती कावळे, उर्मिला बोराडे, प्रथमा श्रीखंडे, तनुजा पांडे, पायल पटेल, सत्त्या निमकर या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी जोगी हिने केले.तर आभार प्रदर्शन हर्षा ससनकर हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनिता काकडे, रत्नमाला मांडवकर चंद्रकांत गहूकर, राजेश वानखेडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित
होते.