ज्ञानकोशकार श्रीधर केतकर पुण्यतिथी’; अभिवादन कार्यक्रम साजरा

ज्ञानकोशकार श्रीधर केतकर पुण्यतिथी’; अभिवादन कार्यक्रम साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: मराठीतील ख्यातनाम ज्ञानकोशकार स्व. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अ. भा. साहित्य परिषद, पुणे आणि केतकर कुलसभा यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी प्रा. श्याम भुर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानकोश तयार करण्यासाठी केतकरांचे अपरिमित कष्ट, संघर्ष याबाबतची माहिती दिली. डाॅ.अनुजा कुलकर्णी यांनी केतकरांच्या ज्ञानकोशा व्यतिरिक्त कादंबऱ्या इत्यादी लेखनाचा वेध घेताना “भारतीय जाती संस्थेचा इतिहास ” या विषयावरील केतकर यांचा अभ्यास, ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी त्यांनी उभी केलेली कंपनी, शीलवती केतकर यांची याकामी झालेली मदत याबद्दल मनोगत व्यक्त केले. सौ. माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी गेली अनेक वर्षे केतकरांची स्मृती जागवण्यासाठी होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनियुक्त कार्यवाह शिरीषजी चिटणीस, सौ. सुनीताराजे पवार तसेच प्रकाश केतकर,संजय केतकर व केतकर कुटुंबीय व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles