“विदर्भवासी -पुणे निवासींसाठी प्रवासाची सोय”

“विदर्भवासी -पुणे निवासींसाठी प्रवासाची सोय”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विदर्भ मित्रमंडळ’ च्यावतीने सशुल्क बसची व्यवस्था_

_मतदानासाठी थेट बससेवा उपलब्ध_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: सध्या पुणे निवासी ,परंतु मुळचे नागपूरकर असलेल्या मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदानास जाण्यासाठी विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने दि.१९ एप्रिल रोजी विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व आदर्श अशी निवडणुक पद्धत मानली जाते. मतदान करणे, हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपली लोकशाही अधिक सशक्त होण्यासाठी आणि देशाच्या हितकर भविष्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. परंतु अजुनही लोकांमध्ये मतदानाबद्दल औदासिन्य दिसून येते. म्हणूनच मतदारांना मतदान केंद्राकडे घेऊन जाणे हे सध्या मोठे आव्हान आहे.

वास्तविक लोकांनी लोकांसाठी लोकांच्या या राज्यात 100 टक्के मतदान व्हावे,अशी लोकशाही आणि संविधान याविषयी आस्था बाळगणा-या लोकांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र सरासरी 50 ते 60 टक्के इतकेच मतदान होते. खरे तर धर्म, पंथ, जात, लिंग,उच्च-निच असा कुठलाही भेदभाव न बाळगता जास्तीत जास्त मतदानात होईल तो सुदिन असेल. विशेषतः यावेळची लोकसभेच्या निवडणूकीचे देशात व देशाबाहेरही मोठे औत्स्युक्य आहे. मोदी विरूध्द गांधी अशी.ही निवडणुक असल्याचे चित्र माध्यमातून रंगविण्यात येत आहे.

अशा अटीतटीच्यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभागी झाले पाहिजे. परंतु नागपूरला जाण्या-या रेल्वे व बसची आरक्षणे आत्ताच पूर्णपणे संपली असून आरक्षण कोटा पूर्ण भरल्याने “विदर्भवासी -पुणे निवासी” मतदार चिंतेत पडले असल्याने विदर्भ मंडळच्या वतीने मुद्दाम खास ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कितीही आडचणी आल्या तरी त्यावर मात करून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे नम्र आवाहन प्रबोधन मंच, विदर्भ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नागपूर मतदार मूळ यादीत ज्यांची नावे आहेत, पण सध्या पुण्यात नोकरी निमित्त, शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी पुणेमुक्कामी राहणारे आहेत, अशा मतदारांना दि.१९ एप्रिलला मतदानाला नागपूरला जाण्यासाठी ‘विदर्भ मित्रमंडळ’ च्यावतीने सशुल्क बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी इच्छुक मतदारांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles