चिलमी गप्पा
चिलमी गप्पा रे मारून
झालंय का कुणाचं भलं
गल्लीत राहून दिल्लीवर
कशाला करताय रे खल ?
चिलमी गप्पा बिनबुडाच्या
तरूण तुर्क रे कुटत बसती
विचारवंताचा आणून आव
तलफ मिटता खेळती डाव
चिलमी गप्पा सोडती धूर
आपुलकीचा इथं बिघडे सूर
तोकडा विचार शब्दांचा वार
चिलमी गप्पांनाच पुरेना पार
चिलमी गप्पांच्या रे नादात
भिंती रंगविती थुंकून दारात
निरर्थक ही करती चुगल्या
चिलमी गप्पा होती खुजल्या
चिलमी गप्पा द्या सोडचिट्टी
शहाणी लोकं करती रे कट्टी
अमूल्य वेळ महत्त्व रे जाणा
स्वाभिमानी रे असावा बाणा
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========