महामानव
वंचितांना दिला
समानता हक्क
बुद्धिमत्ता अशी
सारे झाले थक्क. ॥१
लढा समतेचा
पाण्यासाठी दिला
पाण्याचा तलाव
केलाय तो खुला ॥२
वाघिणीचे दूध
आहे ते शिक्षण
करूया प्राशन
चला सर्वजण ॥३
गरिबांना दिले
सर्वअधिकार
अन्यायाचा सदा
केला प्रतिकार ॥४
राष्ट्र संविधान
केले ते निर्माण
प्रत्येकाने आता
ठेवावी ती जाण ॥५
बालमजुरीची
प्रथा केली बंद
छोट्या बालकांना
झालाय आनंद ॥६
सडा रांगोळीने
सजवू अंगण
महामानवाला
करूया वंदन ॥७
दिपककुमार सरदार
ता.लोणार जि. बुलढाणा
=========